Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय? जाणून घ्या
पुणे : Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या दरांमधील या सततच्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आज गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये एक मोठा बदल दिसून आला. सोन्याचे दर वाढले असले, तरी चांदीच्या किमतीतही बदल नोंदवले गेले आहेत.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १, ४४,८४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३२,७७० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २३५,२८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,३५३ रुपये आहे.
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३२,५५२
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४४,५८०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३२,५५२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४४,५८०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३२,५५२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४४,५८०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३२,५५२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४४,५८०