Pune Crime News | ताटात हात धुतल्याने आपल्याला मारहाण केल्याचा माजी सरपंचाचा दावा; जगदंबा हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, ग्राहकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  ऑनलाईन बिल दिल्यानंतर झालेल्या शाब्दिक वादातून हॉटेल मालकासह त्यांचा मुलगा व ग्राहकाला मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचांनी आपण जेवल्यानंतर ताटात हात धुतल्याचे व रोख रक्कम न देता ऑनलाईन पेमेंट केल्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन पोलिसांनी हॉटेल मालकासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DfoxmHPsO7l

याबाबत रामचंद्र दत्तात्रय काळभोर (वय ४८, रा. रायवाडी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन राजू चौधरी, मयुर चौधरी, दीपक कुकरेजा, ओम चौधरी (सर्व रा. लोणी काळभोर) व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कदम वाक वस्तीतील जगदंबा हॉटेलमध्ये ९ नोव्हेबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर ऑनलाईन बिल आले का अशी विचारणा करताना झालेल्या शाब्दिक वादावादीतून चौघांनी हॉटेल मालक, त्यांचा मुलगा आणि ग्राहक यांना हाताने मारहाण करुन जखमी केले होते. राजेंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याविरुद्ध रामचंद्र काळभोर यांनी फिर्याद दिली आहे.

रामचंद्र काळभोर यांच्या म्हणण्यानुसार फिर्यादी यांनी हॉटेलमध्ये जेवण करुन झाल्यावर ताटामध्ये हात धुतले. तसेच रोख रक्कम न देता ऑनलाईन पेमेंट केले. त्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी रामचंद्र काळभोर, फिर्यादीचा भाऊ राहुल व इतर नातेवाईक यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. हाताने मारहाण करुन जखमी केले आहे. पोलीस हवालदार नळे तपास करीत आहेत.

You may have missed