Pune Crime News | प्रेमात फसवणुक झाल्याच्या दु:खातून सराफ व्यावसायिकाने गळफास घेऊन संपवले आपले जीवन, 12 पानी सुसाईड नोटवरुन तरुणीवर गुन्हा दाखल

Pune Crime News | A jeweler hanged himself due to the grief of being cheated in love, a case was registered against the young woman based on a 12-page suicide note

पुणे : Pune Crime News | सोशल मीडियावरील ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून वेगवेगळी कारणे दाखवून लुबाडणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर सराफ व्यावसायिकाने दुकानामध्येच टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविले. मृत्यु पूर्वी लिहिलेल्या १२ पानी सुसाईड नोटवरुन फुरसुंगी पोलिसांनी तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रतीक राजेंद्र मेमाणे (वय २९, रा. फुरसुंगी) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल राजेंद्र मेमाणे (वय ६३) यांनी फुरसुंंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी श्रेया दादासो खोपडे देशमुख (शिक्केकरी) (रा. आंबेड, भोर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ ते ६ मार्च २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यांचे फुरसुंगी येथे शर्वरी ज्वेलर्स या नावाने सराफी पेढी आहे. त्यांचे श्रेया हिच्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. ओळखीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. श्रेयाने प्रतीकला लग्नाचे आमिष दाखविले. प्रतीकने तिला ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, टॉप्स, ड्रेस आदि वस्तू भेट दिल्या होत्या. तिने आपल्याला कॅन्सर झाल्याचे खोटे सांगितले होते. तरीही प्रतिक तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला होता. मात्र श्रेया काही ना काही कारण काढून त्यांची भेट घेण्याचे टाळत होती. आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याची भावना प्रतिक याची झाली. त्यातून त्याने १२ पानी सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर दुकानातच आपले जीवन संपविले. प्रतिक याच्यावर अत्यंसंस्कार व धार्मिक विधी पार पडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना ही सुसाईड नोट मिळाली. त्यावरुन पोलिसांनी श्रेया हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नाहीतर माझा आत्मा तिला सोडणार नाही

प्रतीकने आत्महत्या करण्यापूर्वी १२ पानांची सुसाईड नोट लिहून तरुणीवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीने फसवणूक केल्यानंतर लग्नाची भीती वाटू लागली आहे. लग्न करण्याची इच्छा संपली आहे. फसवणुकीनंतर आई-वडिलांसाठी जगायचे ठरवले होते, पण मनातून ही गोष्ट जात नाही. यातून बाहेर पडता येत नाही. मला ती आवडली होती; मात्र तिने धोका दिला आहे. आई, वडील, ताई मला माफ करा. तिला फाशी द्या, अशी माझी इच्छा आहे; नाहीतर माझा आत्मा तिला सोडणार नाही, असे पत्रात म्हटले आहे.

You may have missed