Pune Crime News | पोलीस बनले कॉलेजकुमार ! विमाननगरमध्ये हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु असलेल्या हुक्का पार्लर, विना परवाना बारवर पोलिसांचा छापा,  दीड लाखांची विदेशी दारू, हुक्का साहित्य केले जप्त, 7 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | विमाननगर येथील हॉटेलमध्ये राजरोजपणे विना परवाना बार चालविला जात असून हुक्का पार्लरही सुरु आहे, अशी बातमी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी या हॉटेलची रेकी केली. पोलीस कॉलेजकुमार बनले़ तेथे नेहमी जाणार्‍या एकाला गाठले. त्याला आम्हाला आत सोडत नाही, असे सांगितले. तेव्हा तो त्यांना घेऊन गेला. इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत लिफ्ट जाते. तेथून पुढे टेरेसवर शेड टाकण्यात आली होती. तेथे जाण्यासाठी अगोदर चौकशी केली जाते. या माणसाने माझे गेस्ट आहेत, असे सांगितल्यावर त्याने मागच्या दरवाजाने कॉलेजकुमार बनलेल्या पोलिसांनी अ‍ॅटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेलमध्ये नेले. आत सर्व ग्राहक विदेशी दारुचा आणि हुक्क्याचा आस्वाद घेण्यात रमले होते.  अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा घालून १ लाख ४७ हजार रुपयांची विदेशी दारु, हुक्का साहित्य जप्त केले आहे. येथील ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

स्वप्निल शांताराम तांबे Swapnil Shantaram Tambe (वय ३२, रा. स्वस्तिक कोलो, केसनंद फाटा, वाघोली), अमेय मुकेश अजमिरे Amey Mukesh Ajmire (वय २८, रा. पाम अटलांटिस बावडी रोड, वाघोली), नवरंग विठ्ठलराव कोल्हे Navrang Vitthalrao Kolhe (वय २८, रा. अटलांटिस रुफ टॉप लाऊंज, रॉयल टॉवर, विमाननगर), अमितकुमार दयालजी गोयल Amitkumar Dayalji Goyal (वय २६, रा. फॉरेस्ट एज, खराडी), कमरुल इस्लाम लष्कर Qamrul Islam Lashkar (वय २६, रा. साईनाथ नगर, खराडी), शिवमकुमार श्रीरामराज यादव Shivamkumar Shriramraj Yadav (वय २३), माहरुफ अफताफउद्दीन आलम Mahroof Aftafuddin Alam (वय १८, रा. साईनाथनगर, खराडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाला ५ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी विमाननगर येथील अ‍ॅटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेल येथे विना परवाना हुक्का पॉर्लर चालू असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करुन पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलमध्ये हुक्का बार चालवून विना परवाना दारुचा साठा करुन विक्री करताना आढळून आले. तेथून पोलिसांनी हुक्का पॉट, विदेशी दारुच्या बाटल्या व इतर साहित्य  तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचा माल जप्त केला आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, पोलीस अंमलदार शेख, पांडुळे, देवकाते, चव्हाण, सोनवणे, कळसकर, बास्टेवाड, महिला पोलीस अंमलदार माकडी यांनी केले आहे.

You may have missed