Pune Crime News | पुणे: उपचारात हलगर्जीपणाचा आरोप; रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या (Video)

Pune Crime News | Pune: Allegation of negligence in treatment; Patient dies, relatives sit with body at police station (Video)

पुणे : Pune Crime News | शहरातील सय्यदनगर भागातील नवजीवन क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी काळेपडळ पोलिस स्टेशनच्या आवारात मृतदेह नेऊन ठिय्या आंदोलन केले होते.

https://www.instagram.com/p/DW8mRfTiRqi

मोहम्मद नफीज वय 35 रा.सय्यदनगर मृत व्यक्तिचे नाव आहे. मृत व्यक्तिच्या कुटुंबीयांकडून बाजू मांडणारे अ‍ॅड तोसीफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर भागात राहणारे 35 वर्षीय मोहम्मद नफीज यांचा अपघात झाला होता.त्यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते.नवजीवन क्लिनिक येथे 8 एप्रिल 2026 रोजी उपचार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी मोहम्मद नफीज यांना सांगण्यात आले की, ऑपरेशन करावे लागेल.त्यानुसार दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ऑपरेशन करण्यापूर्वी एक इंजेक्शन देण्यात आले.त्याचे प्रमाण अधिक झाल्याने, त्यामध्ये मोहम्मद नफीज याचा जागीच मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्या घटनेवर संबधित डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आले. त्यामुळे नवजीवन क्लिनिकचे डॉ.इक्बाल शेख, डॉ.रुमाना शेख यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी, अशी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पण काळे पडळ पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर काळे पडळ पोलीस स्टेशन येथे रुग्णवाहिकेमध्ये मृतदेह नेण्यात आला.

त्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की, नवजीवन क्लिनिक मध्ये मोहम्मद नफीज यांचा मृत्यू झाला आहे.त्यानंतर मृतदेहचा पोस्टमार्टम करण्यात आला असून व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतर संबधित डॉक्टरांवर पुढील कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन दिल्यानंतर आम्ही मृतदेह पोलीस स्टेशन येथील अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेलो.

You may have missed