Pune Crime News | महिलेचा अश्लिल व्हिडिओ काढणार्‍या पत्रकार रोहन कदम आणि त्याच्या इतर 3 पत्रकार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | तुळशीबागेतील एका लॉजमध्ये स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली महिलेचा अश्लिल व्हिडिओ काढून विनयभंग करणार्‍या पत्रकारावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रोहन राजेंद्र कदम Rohan Rajendra Kadam (वय २८, रा. गांधी चौक, वाल्हे, ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. रोहन कदम याच्याबरोबर असलेल्या अन्य तीन पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन कदम हा एका वृत्त वाहिनीचा पत्रकार आहे.

याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी १ वाजता  तुळशीबागेतील एका लॉजवर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन कदम व अन्य तिघे जण तुळशीबागेतील लॉजवर गेले होते. तेथे ते दारु पिले. त्याचवेळी शेजारील खोलीमध्ये एक महिला साडी नेसत होती. दारुच्या नशेत रोहन कदम याने तिचा साडी नेसताना व्हिडिओ काढला. ही बाब लक्षात येताच या महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा जमलेल्या लोकांनी त्या सर्वांना बेदम चोप दिला. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. रोहन कदम याने आपण स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी तेथे गेलो असल्याचे सांगितले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत प्राथमिक चौकशीनंतर शुक्रवारी रात्री उशीरा रोहन कदम व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक तेली तपास करीत आहेत.

प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन कदम याच्या अन्य तीन साथीदारांचा तपास सुरु आहे, असे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले.

You may have missed