Pimpri Cyber Police News | अमेरिकेतील बँकेत ट्रान्सफर करायला लावलेली 56 लाख रुपयांची 100 टक्के रक्कम सायबर पोलिसांनी दिली परत मिळवुन; परदेशातील व्यवहार पूर्ण होण्यास 2 दिवसाचा कालावधी लागत असल्याचा झाला फायदा

Pimpri Cyber ​​Police News | Cyber ​​Police recovers 100 percent of Rs 56 lakhs transferred to US bank; Benefited from 2 days of overseas transactions

पिंपरी /पुणे : Pimpri Cyber Police News | परदेशातील कंपनीसोबत बोलणे सुरु असताना सायबर चोरट्यांनी परदेशी कंपनीशी साधर्म्य असलेला नवीन ई मेल आय डी बनवुन त्याद्वारे दुसर्‍या बँक खात्याची माहिती पाठवून त्यात ५६ लाख रुपये भरायला लावले. फसवणुक झाल्याचे समजताच सायबर पोलिसांनी फिर्यादीची बँक व ज्या अमेरिकन बँकेत पैसे पाठविण्यास सांगितले होते. त्यांना कळवुन हे पैसे फ्रीज केले गेले. आता एक महिन्यानंतर कंपनीला त्यांचे सर्व १०० टक्के पैसे ५६ लाख रुपये परत मिळाले आहे.

संजय जाधव यांची PHBB VALVES PVT LTD या नावाची भोसरी येथे कंपनी आहे. कंपनी ही हार्डवेअरचे काम करते. त्याकरिता त्यांचे परदेशातील wenzhou artech machinery techology co. ltd कंपनीसोबत व्यवहार चालू असतात. त्याच कंपनीची माहिती काढून सायबर चोरट्याने कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने या कंपनीशी साधर्म्य असलेला नवीन ई मेल आय डी बनवुन त्यावरुन कंपनीचे बँक खाते डिटेल बदलून इतर बाहेर देशातील बँक अकाऊंट नंबर देऊन त्यावर हे नवीन बँक खाते आहे. यापुढे या बँक खात्यावर पैस पाठविण्यास सांगून आता ५६ लाख रुपये तात्काळ पाठविण्यास सांगितले. जाधव यांना तो ई मेल खरा वाटल्याने त्यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी ५६ लाख रुपये यु एस ऐ येथील सिटीझन बँकेच्या खात्यावर पाठविले होते. पैसे पाठविल्यानंतर त्यांनी या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून पैसे आले का याबाबत विचारणा केली. त्यांनी आमचे बँक खाते बदलेले नसून आम्ही ५६ लाख रुपयांची मागणी केली नसल्याचे सांगितले. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांनी या तक्रारीचे गांभीर्य ओळखुन ही रक्कम ज्या बँक खात्यावर गेली. त्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यांनी ही रक्कम युनियन बँकेच्या शाखेतून अमेरिकेतील सिटीझन बँकेच्या खात्यात ट्रान्सफर केली होती. सायबर पोलिसांनी दोन्ही बँकेच्या नोडल अधिकार्‍यांची समन्वय साधून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सिटीझन बँकेची भारतात शाखा नाही. त्यामुळे त्यांच्याशी ई मेल करुन सविस्तर माहिती देण्यात आली. परदेशातील व्यवहार पूर्ण होण्यास २ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाला नव्हता. युनियन बँकेला या घटनेची सविस्तर माहिती देऊन तक्रारदार यांची सायबर फसवणूक झालेली आहे, हे सांगण्यात आले. त्यामुळे बँकेने ही रक्कम फ्रीज केली. त्यानंतर ही रक्कम परत देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुरावाला यश प्राप्त झाले असून तक्रारदार संजय जाधव यांची गेलेली सर्व ५६ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर परत मिळाली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस हवालदार रेणुका वाव्हळ, दीपक भोसले, विनायक म्हसकर, पोलीस अंमलदार सोपान बोधवड, माधव आरोटे यांनी केली आहे.

You may have missed