Pune Crime News | चहा दुकानात गुटखा विक्री करणार्‍या विक्रत्याला अटक; मालकावर गुन्हा दाखल, सिंहगड रोडवरील सई आरोग्यदायी गुळाचा चहा येथे कारवाई

arrest (1)

पुणे : Pune Crime News | गुळाचा चहा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंहगड रोडवरील सई  आरोग्यदायी गुळाचा चहा येथे गुटखा विक्री करणार्‍या  विक्रत्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी नम्रता सुभाष मोहिते (रा. मोशी प्राधिकरण) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी विक्रेता मयुर संजय काळे Mayur Sanjay Kale (वय ३२, रा. सई गुळाचा चहा, गोयल गंगा खाऊ गल्ली, सिंहगड रोड) यांना अटक केली आहे. दुकानाचे मालक  राहुल भगवान जागडे Rahul Bhagwan Jagde (रा. पर्वती, सहकारनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना सिंहगड रोडवरील कॅफे सई आरोग्यदायी गुळाचा चहा आणि स्नॅक्स सेंटर येथे गुटखा विकला जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी सावळे, संदीप शिंदे व इतर सहकारी सिंहगड रोडवरील सह्याद्री हाईटस येथे गेले. चहाच्या कॅफेमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवण्याच्या ठिकाणी प्रतिबंधित केलेला पानमसाला, विमल, व्ही तंबाखु, रजनीगंधा, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा  विक्रीला ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी हा २०३० रुपयांचा हा माल जप्त केला. विक्रेता मयुर काळे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण माने तपास करीत आहेत.

You may have missed