Pune Crime News | दारु पिण्यास पैसे न दिल्याने 65 वर्षाच्या मावस भावाने 67 वर्षाच्या भावावर चाकूने गळ्यावर वार करुन केले जखमी; कात्रजमधील घटना

Pune Crime News | 65-year-old uncle stabs 67-year-old brother in the neck with a knife for not paying for alcohol; Incident in Katraj

पुणे : Pune Crime News | त्या दोघांनीही ६० ओलांडलेली, ते मावशीबरोबर एकत्र राहतात. काही काम धंदा न करणार्‍या ६५ वर्षाच्या मावस भावाने ६७ वर्षाच्या कामाला जाणार्‍या भावाला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने रागाच्या भरात मावस भावाने चाकूने गळ्यावर हातावर वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत माधव दत्तात्रय भोपे (वय ६७, रा. महावीर कुंज सोसायटी, संतोष नगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शरण श्रीपाद हेगडे (वय ६५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महावीर कुंज सोसायटीत त्यांच्या राहत्या घरी १८ मे रोजी रात्री ८ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधव भोपे हे अविवाहित असून त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. त्यांची मावशी निशा हेगडे (वय ८५) हिने त्यांचा लहानपणापासून सांभाळ केला आहे. ते तिघे एकत्र राहतात. त्यांचा मावस भाऊ शरण काही कामधंदा करत नाही. तसेच त्याला दारुचे व्यसन आहे. माधव भोपे हे आर्किटेचर असून एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला आहेत. १८ मे रोजी रात्री ते कामावरुन घरी परत आले. तेव्हा शरण हेगडे याने त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागू लागला. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तो रागाने किचनमध्ये गेला. तेथून भाजीपाला कापण्याचा चाकू घेऊन आला. त्यांना काही समजायच्या आत त्याने माधव भोपे यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला, उजव्या हाताच्या बोटावर वार केला. त्यांना शिवीगाळ करु लागला. त्यांच्या गळ्यातील रक्त येऊ लागल्याचे पाहून सोसायटीतील शिवाजी वाल्हेकर व इतरांना आवाज देऊन बोलावून घेतले. सोसायटीतील लोक आल्याचे पाहून शरण हेगडे पळून गेला. वाल्हेकर यांनी रिक्षातून त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके टाकले़ उपचार घेतल्यानंतर त्यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

You may have missed