Pune Crime News | मारहाण करुन दुखापत केल्याच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून लक्ष्मीनगर पोलिसांनी पिस्टलसह केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या माहितीवरुन लक्ष्मीनगर पोलिसांनी मारहाण करुन दुखापत केल्याचा गुन्ह्यातील फरार रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पिस्टलसह पकडले.
साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख Sajid Alias DJ Mohammed Shaikh (वय २०, रा. कामराजनगर, येरवडा) आणि शुभम राजेंद्र बोत Shubham Rajendra Boat (वय २६, रा. ढवळे वस्ती, भारत फोर्ज रोड, घोरपडी) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.
बेकायदा जमाव जमवून मारहाण करुन दुखापत केल्याचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते व सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, रविकांत नंदनवार व त्यांचे सहकारी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, कादीर शेख, अमोल गायकवाड यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, साजिद शेख हा त्याच्या राहत्या घरी येणार आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथक त्याच्या घराजवळ गेले. परिसराची पाहणी केल्यावर आरोपी घरातच लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दरवाजा वाजविला. परंतु, आतून कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करुन दरवाजा उघडण्यात आला. यावेळी रुममधून दोघे जण पहिल्या माळ्याच्या खिडकीतून बाजूच्या रुमवर उतरून पळून जाताना दिसून आले. ते बाजूच्या घराच्या पत्र्यावरुन व स्लॅबवरुन पळू लागले. त्यांचा पाठलाग करुन पोलिसांनी साजिद शेख व शुभम बोत यांना पकडले. साजिद शेख याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाले. पुढील कारवाईसाठी दोघांना येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, भिराव कांबळे, अमोल वायाल, कादीर शेख, अमोल गायकवाड, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, अतुल जाधव, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, सचिन कचेकर यांनी केली आहे.
