Pune Crime News | शिवाजीनगर येथील हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करणार्‍या परदेशी महिलेसह दोघींची सुटका, दोघा एजंटांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Two women, including a foreign national involved in prostitution, rescued from a hotel in Shivajinagar; case registered against two agents.

पुणे : Pune Crime News |  वेश्यागमनातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवुन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात एक परदेशी तरुणींसह परराज्यातील दोन अशा ३ तरुणींची अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने सुटका केली आहे. या तरुणींना वेश्या व्यवसाय करायला लावणार्‍या दोघा एजंटाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विरु आणि  ध्रुव अशी या एजंटांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार वैशाली इंगळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष येथील पोलीस हवालदार भिवरकर यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विरु आणि ध्रुव नावाचे एजंट हे पुण्यातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये देशी व परदेशी तरुणी ठेवून वेश्या गमनासाठी आलेलया मुलींचे फोटो स्वत: ग्राहकांना पाठवून वेश्या गमनासाठीची रक्कम ठरवून ग्राहकांना मुली ठेवलेल्या ठिकाणी वेश्यागमनासाठी पाठवितात, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक याने विरु याच्याशी बोलून वेश्यागमनाकरीता तरुणी हवे असल्याबाबत बोलणे केले.

विरु याने १२ हजार रुपये लागतील, असे सांगून  त्याने शिवाजीनगर येथील द सेनच्युरियन हॉटेल येथे जाण्यास सांगितले. तिथे गेल्यावर त्याने ग्राहकास हॉटेलमधील रुम नंबर कळविला.  रुममध्ये एक तरुणी होती. तिला ५ हजार रुपये देण्यास सांगितले. त्याप्रमाणे बनावट ग्राहकाने पोलिसांना मेसेज करुन come fast positive (कम फास्ट पॉझिटिव्ह ) असे कळविले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तरुणीला ताब्यात घेतले. ही नवी दिल्ली येथील राहणारी आहे. तिच्याकडे केलेल्या चौकशीत आणखी दोन तरुणींना या एजंटने सेनापती बापट रोडवरील ट्रोबो सहारा हॉटेलमध्ये पाठविल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी ट्रोबो सहारा हॉटेलवर छापा टाकून दिल्ली आणि तुर्कमेनिस्तान येथे राहणार्‍या दोन तरुणींना ताब्यात घेतले. दोघा एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, रसाळ, अविनाश कोंडे, जाधव, महिला पोलीस अंमलदार खेडेकर, वैशाली इंगळे, रेश्मा इंगळे यांनी केली आहे.

You may have missed