Pune News | ‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ या भक्तिमय गीताचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या हस्ते प्रकाशन

Pune News | The devotional song ‘You are the master of the world, only you Ganpati’ was released by Deputy Chief Minister Sunetra Tai Pawar

पुणे : Pune News | गणरायाच्या भक्तिभावाला सुरेल संगीताची साथ देणाऱ्या ‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ या भक्तिमय गीताचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्त्या ॲड. रूपालीताई पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

गणपती बाप्पाच्या महिम्याचे आणि भक्तिभावाचे दर्शन घडविणाऱ्या या गीताची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी, अमोल घोडके आणि मधुसूदन गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे. रंगराज पुराणिक यांनी गीताला संगीतबद्ध केले असून, गीताचे शब्द निलेश काटके यांचे आहेत. अभिमन्यू कार्लेकर यांनी संगीत निर्मितीची जबाबदारी सांभाळली असून, सौरभ साळुंके यांनी आपल्या दमदार आणि भावपूर्ण आवाजात हे गीत स्वरबद्ध केले आहे.

या गीताचे रेकॉर्डिंग डॉन स्टुडिओज येथे करण्यात आले आहे. गीताच्या निर्मिती प्रक्रियेत कुणाल माथा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

गणेशभक्ती, भक्तिरस आणि आधुनिक संगीताचा सुरेल संगम साधणारे हे गीत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रसिकांच्या भेटीला आले असून, गणेशभक्तांसाठी ही भक्तिमय संगीताची विशेष पर्वणी ठरणार आहे. ‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ या गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली.

You may have missed