Pune Crime News | पुणे : 18 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रिंगमधून गुंगीचे औषध देऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न; मेसचालकास सहकारनगर पोलिसांकडून अटक
पुणे : Pune Crime News | पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुणीकडून उसने घेतलेले पैसे देण्यासाठी त्याने तिला मोटारसायकलवर बसवुन घेऊन जाऊ लागला. वाटेत थांबून कोल्ड्रिंगच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून ते तिला पिण्यास दिले. तिला बळजबरीने एका ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी सावध झाली. तिने स्वत:ची सुटका करुन घेऊन कॅब बुक करुन पुण्यात परतली. सहकारनगर पोलिसांनी या मेसचालकाला अटक केली आहे.
निलेश सोनू वाझे Nilesh Sonu Waze (वय ३९, रा. चैतन्यनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली होती. याबाबत एका १८ वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिक्षणासाठी पुण्यात आल्या आहेत. त्या एका गर्ल्स होस्टेलमध्ये राहतात. निलेश वाझे याने त्यांच्याकडून २० हजार रुपये उसने घेतले होते. त्यांनी ते पैसे परत मागितले. त्यावेळी त्याने माझ्याकडील सोने गहाण ठेवून तुम्हाला पैसे देतो, असे सांगून त्यांना तो मोटारसायकलवरुन राजगुरुनगर येथील सोनाराकडे जाण्याचा बहाणा केला. वाटेत त्याने कोल्ड्रिंगमध्ये काहीतरी मिसळुन ते त्यांना पिण्यास दिले. त्यामुळे या तरुणीला चक्कर आल्यासारखे झाले. तो त्यांना बळजबरीने कोठेतरी घेऊन जाऊ लागला. तेव्हा ही तरुणी सावध झाली. तिने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. उबेर अॅपवरुन कॅब बुक करुन ती आपल्या होस्टेलवर सुखरुप आली. त्यानंतर दुसर्या दिवशी तिने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने अपहरणाचा गुन्हा दाखल करुन निलेश वाझे याला अटक केली आहे. पोलीस हवालदार किंद्रे तपास करीत आहेत.
