Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हल आयोजित लघुपट स्पर्धा ! “इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!”

Pune Festival 2026 | Short Film Competition organized by Pune Festival! "Legacy of History… Mirror of Pune!"

पुणे : Pune Festival 2026 | पुणे ही केवळ विद्येची, संस्कृतीची आणि कलांची नगरी नाही, तर आपल्या समृद्ध इतिहासाचा आणि वैभवशाली सांस्कृतिक वारशाचा जिवंत आरसा आहे. या नगरीच्या इतिहासाशी जोडलेल्या असंख्य कथा, व्यक्तिमत्त्वे, वास्तू, घटना, परंपरा आणि सांस्कृतिक ठेवा आजही आपल्याशी संवाद साधत आहेत.

याच समृद्ध वारशाला दृक्-श्राव्य माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्यासाठी पुणे फेस्टिव्हलतर्फे “इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!” या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेची संकल्पना व संयोजन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांची असून याचे दिग्दर्शक सुनील नाईक आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई व विश्वस्त मोहन टिल्लू उपस्थित होते.  

स्पर्धेची संकल्पना – या स्पर्धेसाठी विषय आयोजकांकडून दिले जातील. स्पर्धकांनी आयोजकांनी दिलेल्या विषयावर ५ ते १० मिनिटांचा लघुपट तयार करावयाचा आहे. विषयाची मांडणी करताना इतिहास, संस्कृती, परंपरा, व्यक्तिमत्त्वे आणि घटनांकडे सर्जनशील आणि सिनेमॅटिक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी कलावंतांना मिळणार आहे. प्रभावी कथानक, दर्जेदार चित्रिकरण, सुंदर छायांकन, परिणामकारक Voice Over, पार्श्वसंगीत, नाट्यात्मक दृश्यरचना आणि कल्पक सिनेमॅटिक मांडणी यांचा आवश्यकतेनुसार वापर करता येईल.

कलावंतांसाठी विशेष संधी – ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून नवोदित आणि अनुभवी कलावंतांना आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याचे व्यासपीठ आहे. लघुपट बनवणाऱ्या कलावंतांना जागतिक ओळख मिळवून देण्याची ही एक अनोखी संधी आहे. पुण्याच्या इतिहासाची कथा तुमच्या कॅमेऱ्यातून उलगडू द्या. तुमची कल्पना, तुमची दृष्टी आणि तुमची कलाकृती — पुण्याच्या इतिहासाला नवा सिनेमॅटिक आरसा देऊ शकते!

तांत्रिक स्वरूप – कालावधी : ५ ते १० मिनिटे, Format : MP4 / MOV, Resolution : 1080p

पुरस्कार – प्रथम / द्वितीय / तृतीय क्रमांक दिले जातील. त्यात रोख रक्कम + ट्रॉफी + प्रमाणपत्र असणार आहे. तसेच दिग्दर्शन / छायाचित्रण / ध्वनिमुद्रण इत्यादींसाठी विशेष पुरस्कार देखील दिले जातील.

फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख – १० ऑक्टोबर २०२६

एक प्रभावी शेवट – “इतिहास फक्त पुस्तकांत जतन करू नका… तो कॅमेऱ्यात कैद करा! तुमच्या नजरेतून पुण्याचा इतिहास पाहू द्या… कारण तुमचा लघुपट ठरू शकतो — पुण्याच्या इतिहासाचा नवा आरसा!”

संपर्क – www.punefestival.in

You may have missed