Pune Crime News | आईला दारु – गांजा पितो असे सांगितल्याच्या संशयावरुन चौघांनी रेल्वे पोलीस अंमलदारावर चाकूने गळ्यावर वार करुन केले गंभीर जखमी

Pune Crime News | Four people seriously injured a railway police officer by stabbing him in the neck over suspicion that he told his mother he drinks alcohol and smokes weed.

पुणे : Pune Crime News | विकीच्या आईला तो दारु व गांजा पितो, असे सांगितल्याच्या संशयावरुन चौघांनी रेल्वे पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या गळ्यावर, छातीवर वार करुन गंभीर जखमी केले आहे.

पोलीस अंमलदार अक्षय महादेव बोबांळे (वय २८, रा. पुना गेस्ट हाऊस, बुधवार पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विकी पात्रो व रॉकी पात्रो आणि त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल ला आहे. ही घटना लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोरील रोडवर सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय बोबांळे हे लोहमार्ग पोलीस दलात पोलीस अंमलदार आहेत. ते सोमवारी रात्री कामावरुन जेवण करण्यासाठी लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोरील रोडवरुन दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या तोंड ओळखीचे विकी पात्रो व रॉकी पात्रो आणि त्याचे दोन साथीदार यांनी त्यांना अडविले. अक्षय बोबांळे यांनी विकीच्या आईला तो दारु व गांजा पितो असे सांगितले, असा गैरसमज करुन घेतला. त्यावरुन अक्षय यांना तुला आता जिवंत सोडणार नाही, असे बोलून त्यांच्या साथीदारांनी अक्षय यांचे हातपाय पकडले. विकी याने धारदार चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला. रॉकीने चाकूने अक्षय यांच्या छातीवर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने वार केले. त्यात अक्षय हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या मोबाईल व दीड लाख रुपयांची गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन हिसकावुन नेली आहे.

ही घटना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस उपनिरीक्षक रंगराव पवार, गणेश चव्हाण, राहुल पवार, अमोल धुमाळ व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

You may have missed