Maharashtra Rain Updates | मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; मान्सूनच्या परतीला ब्रेक, महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचा इशारा

Rain

मुंबई/पुणे : Maharashtra Rain Updates | महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून मुंबई, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाची ही नवी सक्रियता मान्सूनच्या परतीच्या प्रक्रियेला अडथळा ठरण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस अस्थिर हवामान कायम राहू शकते.

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः मोकळ्या जागेत आणि प्रवासादरम्यान आवश्यक खबरदारी घ्यावी.

You may have missed