Pune Festival’s Bappa | पुणे फेस्टिव्हलच्या बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना; पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी दाम्पत्याच्या हस्ते पूजा-अर्चा

Pune Festival's Bappa | Ceremonial installation of the Pune Festival's Bappa; rituals performed by PMRDA Commissioner Abhijit Chaudhari and his wife.

पुणे : Pune Festival’s Bappa | गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पुणे फेस्टिव्हलच्या गणरायाची पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त अभिजित चौधरी आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुश्री चौधरी यांच्या हस्ते गणरायाची पूजा आणि आरती करण्यात आली.

यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष अभय छाजेड, सचिव डॉ. सतीश देसाई, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि फेस्टिव्हलचे विश्वस्त रमेश बागवे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पुणेकर उपस्थित होते.

चौधरी दाम्पत्याचा यावेळी पुणे फेस्टिव्हलतर्फे सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर बोलताना अभिजित चौधरी यांनी, “पुणे फेस्टिव्हल हा केवळ एक उत्सव नाही, तर असंख्य पुणेकरांची भावना आहे. त्यामुळेच तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव बनला आहे,” असे मत व्यक्त केले.

पुणे फेस्टिव्हलची सुरुवात दिवंगत सुरेश कलमाडी यांनी केली होती. गेल्या अनेक वर्षांत या उत्सवाने पुणेकरांच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. यंदा फेस्टिव्हलमधील सर्व उपक्रम आणि कार्यक्रम पुणेकरांसाठी मोफत ठेवण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यंदाच्या उत्सवाला सुरुवातीपासूनच पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पुणे फेस्टिव्हलचा लौकिक पुन्हा देशभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

You may have missed