Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकाला 2 कोटींना गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याचे चीन कनेक्शन आले समोर; सायबर पोलिसांनी 5 व्या आरोपीला केली अटक

Pune Cyber Crime News

पुणे : Pune Crime News |  पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने बोलत असल्याचे भासवुन अकाऊंटंट मॅनेजरला विविध बँक खात्यात रक्कमा ट्रान्सफर करावयास लावून १ कोटी ९५ लाख रुपयांना गंडा घालणार्‍या सायबर टोळीतील ५ व्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या सायबर चोरट्याचे चीन कनेक्शन समोर आले आहे.

रोहन रामेश्वर जाधव Rohan Rameshwar Jadhav (रा. संभाजीनगर) असे अटक केलेल्या सायबर चोरट्याचे नाव आहे. सायबर पोलिसांनी या अगोदर ४ जणांना अटक केली आहे.

ही घटना २८ व २९ जानेवारी २०२६ दरम्यान कोथरुड येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घडली होती. कंपनीचे मालक यांच्या नावाचा व फोटोचा गैरवापर करुन सायबर चोरट्यांनी २ बँक खात्यात कंपनीच्या कामासाठी पैसे  पाठवण्यास सांगून १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केली होती.

या गुन्ह्याच्या तपासात फिर्यादी यांच्या रक्कमा ज्या ज्या बँक खात्यांवर ट्रान्सफर झाल्या, त्या सर्व बँकांना तात्काळ ईमेलद्वारे पत्रव्यवहार करुन ती बँक खाती, डेबिट तसेच लिनफ्रिज करण्यात आली.  या फसवणुकीच्या एकूण रक्कमेपैकी ९५ लाख रुपये हे अ‍ॅक्सीस बँक खात्यात ट्रान्सफर झाले होते. या अकाऊंटवरुन ही रक्कम ज्या ज्या बँक खात्यांना ट्रान्सफर झाल्या़ त्याचे ट्रेलच्या तसेच बँकांकडून प्राप्त माहितीमधील ई मेल आयडी, मोबाईल फोन त्यांचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ५ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी रोहन जाधव याचे चीन कनेक्शन असल्याचे मिळून आले आहे. तसेच अन्य १ कोटी रुपये ट्रान्झेक्शनच्या ट्रेलचा तपास सुरु आहे. या गुन्ह्यातील एकूण ५० लाख २६ हजार १७१ रुपये परत मिळवुन देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शुभदा संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

You may have missed