Pune Crime News | पुणे : गणेश पेठेत मिरवणुकीनंतरच्या किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी भात वाढणीने हल्ला

Pune Crime News | Pune: Youth attacked with an iron serving spoon following a minor dispute after a procession in Ganesh Peth.

पुणे : Pune Crime News | गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी भात वाढणी मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गणेश पेठेतील बुरूड आळीत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जखमी तरुणाचे नाव अविनाश दत्तात्रय येनपुरे असे आहे. याप्रकरणी अक्षय हादगे Akshay Hadge (वय 25, रा. बुरूड आळी, गणेश पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दत्तात्रय येनपुरे (वय 45) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्याद हे मित्रांसोबत बुरूड आळीतील एका गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर कार्यकर्त्यांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.

मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास जेवण सुरू असताना फिर्यादी यांनी महिलांना प्रथम जेवण वाढावे, असे सांगितले. याच कारणावरून आरोपीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.

वाद वाढल्यानंतर आरोपीने लोखंडी भात वाढणी  फिर्यादी  यांच्या डोक्यात मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेनंतर आरोपी पसार झाला असून फरासखाना पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस हवालदार संदीप धनवटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

You may have missed