No Parking Zone In Pune | पुणे : मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील 10 प्रमुख रस्त्यांवर नो-पार्किंग

No Parking Zone In Pune | Pune: No-parking on 10 main roads in the city until the main Ganesh immersion procession ends

पुणे: No Parking Zone In Pune | मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी 24 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत शहरातील 10 प्रमुख रस्त्यांवर वाहनतळ बंदी लागू केली आहे.

पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि महावितरणच्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गांवर उभे करण्यास मनाई असेल.

वाहनतळ बंदी पुढील रस्त्यांवर लागू राहणार आहे:

लक्ष्मी रस्ता: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक
केळकर रस्ता: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
कुमठेकर रस्ता: शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक
टिळक रस्ता: जेधे चौक ते अलका टॉकीज चौक
बाजीराव रस्ता: पुरम चौक ते फुटका बुरुज चौक
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता: गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
शास्त्री रस्ता: सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक
जंगली महाराज रस्ता: झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक
कर्वे रस्ता: नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक
फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता: खंडोजीबाबा चौक ते गुडलक चौक

याशिवाय खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या 100 मीटर परिसरातही वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

या सर्व रस्त्यांवरील नियमित वाहनतळ व्यवस्था मुख्य विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत तात्पुरती स्थगित राहणार आहे.

You may have missed