Pune Traffic Updates | पुणे :  गणेश विसर्जनादरम्यान धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा व ससाणे नगर, हडपसर परिसरातील वाहतुकीत बदल

Pune Traffic Updates | Pune: Traffic changes in Dhayari Phata, Keshvanagar-Mundhwa, and Sasane Nagar, Hadapsar areas during Ganesh immersion

पुणे: Pune Traffic Updates |  गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी धायरी फाटा, केशवनगर, मुंढवा, ससाणेनगर आणि हडपसर परिसरात तात्पुरते वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक मार्ग बंद

25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत धायरी फाटा येथून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग: स्वारगेटकडून येणारी वाहने धायरी उड्डाणपूल, राजयोग सोसायटी चौक, नांदेड सिटी चौक आणि कॅनॉल पूल ओलांडून डावीकडे वळून धायरी व उंबऱ्या गणपती चौकाकडे जाऊ शकतील.

सिंहगड रस्त्यावरून वडगाव भाजी मंडई, चरवड वस्ती, तुकाईनगर आणि साईनगर परिसराकडे जाणारी वाहतूकही सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

या वाहनांना गोयल गंगा चौक-सिंहगड कॉलेज रस्ता किंवा वीर बाजी पासलकर चौक मार्गे पुढे जाता येईल.

केशवनगर-मुंढवा परिसरात एकेरी वाहतूक

25 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून गणेश विसर्जन होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर, मुंढवा आणि ससाणेनगर परिसरात वाहतूक बदल लागू राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मांजरी रस्त्याने न जाता रेणुका माता मंदिराजवळून उजवीकडे वळून मांजरी रस्त्याकडे जावे.

गायरान वस्ती येथून मुंढवा चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांनी रेणुका माता मंदिराजवळून डावीकडे वळावे. त्यानंतर व्यंकटेश ग्राफिक्स येथून उजवीकडे वळून मुंढवा चौकाकडे जाता येईल.

ससाणेनगर आणि हडपसरमध्येही वाहतूक निर्बंध

24 आणि 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक निर्बंध लागू केले जाणार आहेत.

काळेपडळ अंडरपास येथून ससाणेनगर मुख्य रस्त्याकडे येणारी वाहतूक बंद राहील. वाहनांना समृद्धी सोसायटी, रवी पार्क रस्ता, हांडेवाडी रस्ता आणि ससाणेनगर अंडरपास मार्गे जाता येईल.

काळेपडळकडून नवनाथ चौक गणपती मंदिर तसेच डी-मार्टमार्गे ससाणेनगर मुख्य रस्त्याकडे येणारी वाहतूकही बंद राहणार आहे. या वाहनांना काळेपडळ-तुकाई दर्शन-गोंधळेनगर-हडपसर गाडीतळ मार्गे जाता येईल.

न्यू इंग्लिश स्कूल डीपी रस्ता, ससाणेनगर अंडरपास येथून ससाणेनगर मुख्य रस्त्याकडे येण्यासही मनाई राहणार आहे. वाहनांना सय्यदनगर-हांडेवाडी रस्ता-रवी पार्क रस्ता-काळेपडळ अंडरपास किंवा वैदुवाडी-रामटेकडी मार्गाचा वापर करता येईल.

हडपसरकडून ससाणेनगर रस्त्याने सय्यदनगरकडे जाणारी वाहतूक एसबीआय बँकेशेजारील डी-मार्टमार्गे काळेपडळकडे वळविण्यात येणार आहे.

You may have missed