Hadapsar Pune Crime News | हडपसर) पुणे : ससाणेनगर येथील विसर्जन घाटावर महिला पोलिसाच्या तोंडावर नारळ फेकून मारल्याने दात पडले; तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : Hadapsar Pune Crime News | गणपती विसर्जन घाटावर गर्दी नियंत्रण करत असताना विसर्जनासाठी जमलेल्या लोकांवर तिघांनी दगडफेक केली. त्यात फेकलेला नारळ तोंडावर लागल्याने महिला पोलीस अंमलदाराचे दात पडले .
याबाबत ३८ वर्षाच्या महिला पोलीस अंमलदारांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन जितेनसिंग जितेंद्रसिंग टाक Jitensingh Jitendrasingh Tak (वय २१), चिंटूसिंग जितेंद्रसिंग टाक (Chintusing Jitendrasingh Tak) आणि राजवीर दारासिंग भोड Rajveer Darasingh Bhod (सर्व रा. नवीन म्हाडा कॉलनी, वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसरमधील ससाणेनगर येथील गणपती विसर्जन घाटावर २५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पोलीस अंमलदार या ससाणेनगर येथील विसर्जन घाटावर कर्तव्यावर होत्या. घाटावर गर्दीचे त्या नियंत्रण करत होत्या. यावेळी विसर्जन हौदातून मूर्ती काढण्यावरून वाद झाला. त्यावेळी तिघांनी विसर्जनासाठी जमलेल्या लोकांवर दगडफेक केली. त्याचवेळी त्यांनी फेकलेला नारळ महिला पोलीस अंमलदार यांच्या तोंडावर लागला. त्यात त्यांचा समोरील एक दात पडला व खालील समोरील २ दात हलल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक राऊत तपास करीत आहेत.
