Pune Crime News | गणेश भेळमधील सहकार्यांचे मोबाईल चोरुन त्यातील पासवर्डचा वापर करुन बँक खात्यातून केले दीड लाख लंपास
पुणे : Pune Crime News | गणेश भेळ येथे काम करत असताना दोघा सहकार्यांचे ३ मोबाईल फोन चोरुन नेऊन त्यातील पासवर्डचा वापर करुन एकाने बँक खात्यातून १ लाख ५९ हजार रुपये चोरुन नेल्याच्या आरोपातून कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चंदन रामफल मौर्य (वय २९, रा. हिल व्हियु रेसिडेन्सी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल सहदेव राय Rahul Sahdev Rai (वय २१, रा. भस्का गाझीपूर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरुडमधील हिल विव्ह रेसिडेन्सी येथे १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४ ते २२ सप्टेंबर दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदन मौर्य हे व त्यांचा मित्र आणि राहुल राय हे एकत्र राहत असून ते गणेश भेळ येथे नोकरी करतात. १७ सप्टेंबर रोजी पहाटे राहुल राय याने दोघांचे तीन मोबाईल चोरुन नेले. मोबाईलमध्ये त्यांच्या बँक खात्याची सर्व माहिती होती. त्यावरुन त्याने फिर्यादी यांच्या बँक खात्यातील १ लाख २३ हजार आणि मित्राच्या बँक खात्यातील १५ हजार असे १ लाख ३८ हजार रुपये चोरुन काढून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी राहुल राय याचा शोध घेतला, परंतु, तो मिळून न आल्याने शेवटी त्यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल ढोले तपास करीत आहेत.
