Pune Crime News | पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॉर्न वाजवल्याच्या रागातून एसटी चालकाला लोणावळ्यात बेदम मारहाण; एकावर गुन्हा
पुणे/लोणावळा : Pune Crime News | जुना पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा हद्दीत एसटी बसचालकाला कथित मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना खंडाळ्यातील वाघजाई मंदिरासमोर बुधवारी (30 सप्टेंबर) सायंकाळी घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, बालाजी लक्ष्मण कंठेवाड (वय 47, सध्या रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) हे एसटी बस घेऊन मार्गस्थ झाले होते. त्यावेळी एक व्यक्ती रस्त्यात उभी असल्याने कंठेवाड यांनी हॉर्न वाजविला.
हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने संबंधित व्यक्तीने बसचालकासोबत वाद घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रामदास गोविंद घायतिडक Ramdas Govind Ghayatidak (वय 44, रा. आंबेटाकळी पोखर्णी, जि. परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोणावळा शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोप अद्याप तपासाधीन आहेत.
