Pune Crime News | पुणे : अंमली पदार्थ बाळगून पहाटे मैदानात थांबलेल्या तिघांना पकडून कोंढवा पोलिसांनी जप्त केला एमडी (मेफेड्रोन)
पुणे : Pune Crime News | अंमली पदार्थ बाळगून पहाटेच्या सुमारास मैदानात थांबलेल्या तिघांना कोंढवा पोलिसांनी संशयावरुन पकडले. त्यांच्या झडतीमध्ये ५५ हजार रुपयांचे १० ग्रॅम मेफेड्रोन (एम डी) जप्त करण्यात आले आहे़.
अमन नईम सय्यद Aman Naeem Sayyad (वय २५, रा. बुद्धीवंत विद्या निकेतन सोसायटी, उंड्री), अनिकेत शैलेश भालेराव Aniket Shailesh Bhalerao (वय २३, रा. अहिल्या सोसायटी, गोल्फ क्लब, फुलेनगर, उंड्री) आणि वैभव बाबासाहेब शेट्टी Vaibhav Babasaheb Shetty (वय १९, रा. वडाची वाडी, उंड्री) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमन सय्यद हा सेल्समन म्हणून काम करतो. तर अनिकेत भालेराव व वैभव शेट्टी हे शिक्षण घेत आहेत.
कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री मध्यरात्रीनंतर केली जाते. पोलीस तसेच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांनी काही दिवसांपूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार २ ऑक्टोंबर रोजी पहाटे गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सुरज शुक्ला व ओंकार शेटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एनआयबीएम उंड्री रोडवरील आनंदवन ६ चे मोकळ्या मैदानात एम डी विक्रीसाठी काही जण आले आहे. या बातमीची खातरजमा करुन पोलीस पथक तेथे पोहचले. त्यांनी मैदानात थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले. अमन याच्याकडून ६ ग्रॅम तर अनिकेत भालेराव याच्याकडून ३ ग्रॅम एम डी जप्त केला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी वैभव शेट्टी याच्याकडून हा एम डी घेतल्याचे सांगितले. तिघांकडून १० ग्रॅम व दुचाकी असा ५५ हजार ४८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार अमोल हिरवे, रवींद्र चिपा, कारखेले, पोलीस अंमलदार शाहिद रजपूत, प्रशांत खाडे, रियाज पटेल, रशिद, रवी जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, सुरज शुक्ला, केशव हिरवे, राहुल रासगे, अमित सूर्यवंशी, शेख, शेलार, ओंकार शेटे यांनी केली आहे.
