Nava Vishnu Chowk Mandal Pune | पुणे : नवा विष्णू चौक मित्र मंडळ यांच्या तर्फे नवरात्री निमित्त स्तुत्य उपक्रम; ससून रुग्णालयातील नवजात बालीकांना कपडे व ड्रायफ्रूट लाडूचे वितरण (Video)

Nava Vishnu Chowk Mandal, Pune | Pune: Commendable initiative by Nava Vishnu Chowk Mitra Mandal for Navratri; distribution of clothes and dry-fruit laddoos to newborn baby girls at Sassoon Hospital (Video).

पुणे : Nava Vishnu Chowk Mandal Pune |  पुण्यातील नवा विष्णू चौक मित्र मंडळ, मध्ये भक्ती व भावपूर्ण वातावरण देवीची स्थापना करण्यात येते. 1978 साली या देवीची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत विविध उपक्रमाची रेलचेल पाहायला मिळते.

https://www.instagram.com/p/DebV04cpL1_

नवरात्रीच्या काळात ससून हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या 9 बालीकांना कपडे  व त्यांच्या पालकांना पोशाख आणि ड्रायफ्रूट लाडू याचे वितरण दरवर्षी करण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार रेनुसे यांनी दिली.

नवरात्री निम्मित जोगवा मागून, स्थिर वादन केले जाते, या जमा झालेल्या धान्याचे गरजवंतांना वाटप केले जाते.

अष्टमी दिवशी अंध मुलींची पूजा देखील मंडळा कडून करण्यात येते.

नऊ दिवस एक लकी ड्रॉ काढून महिलांना  साडी वाटप करण्यात येते. महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्या करिता विविध उपक्रम राबवले जातात.

माहेरची साडी या चित्रपटा वेळी विजय कोंडके यांच्याकडून शूटिंग साठी या देवीच्या मूर्तीची मागणी करण्यात आली होती. या देवीचे प्रतिमा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल.

पुढच्या वर्षी मंडळाला 50 वर्षे पूर्ण होत असून, विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची देखील रेलचेल पाहायला मिळणार आहे.

त्याच बरोबर रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, महिला सन्मान सत्कार, अंध व्यक्तींना मदत, दुष्काळ ग्रस्त भागात अन्न धान्य व गरजेच्या वस्तू देऊन मदत केली जाते.

उभ्या स्वरूपात असलेली ही देवीची अत्यंत आकर्षक मूर्ती मन मोहुन टाकते.

You may have missed