Pune Crime News | पुणे : ‘तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग आणि आधी …. गोळ्या घालेन’ ! आ. जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime News | Pune: 'I've come to your door, tell me to enter, and first... I'll shoot!' The person who threatened to kill MLA Jitendra Awhad is in police custody

पुणे : Pune Crime News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करुन आणि मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला घरमालकाने लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले.

https://www.instagram.com/p/Dev0PHWDXj2/?utm_source=ig_web_copy_link&xtok=MzRlODBiNWFlZA==&srtk=MzRlODBiNWFlZA==

विशाल माधवराव बिच्चेवाड Vishal Madhavrao Bichewad (वय ३९, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे धमकी देणार्‍याचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी त्याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अनिल बिच्चेवाड हा सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून नोकरी करतो.

आमदार जितेंद्र आव्हाड यांना १९ ऑक्टोंबर रोजी रात्री २ ते ३ वेळा फोन करुन आणि मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग आणि आधी जित्याला गोळ्या घालेन’, असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आव्हाड यांनी ही बाब स्वत: पत्रकारांना सांगितली.

टिव्हीवरील न्यूजमध्ये ही बातमी घरमालकाने पाहिली. आपल्याकडे भाडेकरु म्हणून राहणार्‍या विशाल याचेच हे काम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्याला पकडून लोणीकंद पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे पोलीस तातडीने लोणीकंद पोलीस ठाण्यात आले. त्यांनी विशाल बिच्चेवाड याला ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे.

You may have missed