Pune Crime News | अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने विवाहितेला मारहाण करुन गळा दाबून जीवे मारण्याचा केला प्रयत्न, तीन तास करत होता मारहाण,  व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या  पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  वेगवेगळ्या तरुणींबरोबर  अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने नाका, तोंडावर, कानावर, डोक्यात मारहाण करुन विवाहितेचा गळा दाबुन जीवे ठार मारण्यात प्रयत्न केला.  तब्बल तीन तास या विवाहितेला तो मारहाण करत होता. ती बेशुद्ध पडल्यावर शुद्धीवर आणून  पुन्हा मारहाण करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहितेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या  पतीविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अब्दुल लालाभाई शेख Abdul Lalabhai Shaikh (वय ३२, रा. उंड्री) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका विवाहितेने काळेपडळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या व्यावसायिक असून त्यांचे अब्दुल शेख याच्याबरोबर ४ वर्षापूर्वी लग्न झाले आहे. दोन वर्षापर्यंत त्यांचा संसार व्यवस्थित चाललेला होता. त्यानंतर अब्दुल शेख याचे वेगवेगळ्या तरुणींबरोबर अनैतिक संबंध असल्याचे त्याना समजले. त्यावरुन त्यांनी जाब विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या लॅपटॉपवर त्याचेही लॉगिन होते. त्यामुळे त्याला व्हाटसअ‍ॅपवर आलेले मेसेज तिला पाहता आले. त्यातून त्याचे बार बालापासून वेगवेगळ्या तरुणींबरोबर संबंध असल्याचे लक्षात आले. तिने त्याला समजावुन सांगितले. तरी तो तिला मानसिक त्रास देत होता. तिच्यावर संशय घेऊन तिच्या पाठीमागे वेगवेगळी मुले लावून पाळत ठेवत असे. ती काय करते, कोठे जाते याची माहिती जमवत असतो. तिच्या नावावर नेवासा येथील जमीन त्याच्या नावावर करण्यासाठी नेहमी त्रास देत असतो. तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतो.

१ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता अब्दुल शेख याने तु मला सांग मी कोठे डान्स बारमध्ये गेलो होते, तु मला पुरावे दे, असे म्हणून तिच्याशी वाद सुरु केला. या वादावरुन त्याने तिच्या तोंडावर, हाताने मारहाण केली़ तिचा गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पहाटे ५ वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत मारहाण करीत होता. तिचे प्रेमसंबंध असल्याचे कबुल करुन घेण्याचा प्रयत्न करीत होता. ती बेशुद्ध झाल्यावर तिला पुन्हा शुद्धीवर आणून पुन्हा मारहाण करीत होता. त्यात ती जखमी झाल्यावर तिला तोडकर रुग्णालयात नेले. तेथे ती बाईकवरुन पडल्याचे खोटे सांगून एमएलसी करण्याचे टाळले. त्यानंतर तिने आईला दवाखान्यात बोलावून घेतले. त्यानंतर तिने ११२ वर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर तपास करीत आहेत.

You may have missed