Pune Pimpri Crime News | चिनी सायबर चोरट्यांशी संधान साधून फसवणूक करणाऱ्या दुबईतील चोरट्याला  केले जेरबंद

Pune Pimpri Crime News | Dubai thief who tricked people by contacting Chinese cyber scammers arrested

पुणे : Pune Pimpri Crime News | चिनी सायबर चोरट्यांशी संगनमत करून दुबईत बसून साथीदारांच्या मदतीने लोकांची फसवणूक करणाऱ्या चोरट्याला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दुबईहून परत पाठवल्यावर मुंबई विमानतळावर अटक केली.

सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे Sumant alias Nanu Ravindra Dasare (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पिंपरी चिंचवड परिसरात सायबर फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत. तपासामध्ये आरोपी हे परदेशात राहून वेगवेगळे बँक खाती प्राप्त करून सायबर गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर गुन्ह्यातील बँक खाती पुरवणाऱ्या टोळीचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना माहिती मिळाली की तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. साने वस्ती, चिखली) हा बँक खाती काढून त्यावर साथीदारासह सायबर गुन्ह्यातील रक्कम स्वीकारून ती रोख स्वरुपात काढत आहे.

याबाबत माहिती घेवून तुषार चौधरी याचा शोध घेत असताना त्याने त्याचे साथीदार आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) याच्या साथीने त्याचा दुबई येथील साथीदार सुमंत दसरे याच्या साथीने सायबर गुन्ह्यातील पैसे घेवून ते काढून घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्याकडे तपास केला. ते वेगवेगळ्या बँकेत खाती काढून त्यांची माहिती सुमंत यास देवून त्यावर तो सायबर फसवणुकीतील पैसे पाठवत होता. ते पैसे तुषार व आदर्श हे रोख स्वरुपात चेकने काढून त्यांचे कमिशन ठेवून उर्वरित रक्कम सीडीएम मार्फत सुमंत याने दिलेल्या बँक खात्यावर दुबईला पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर सुमंत दसरे हा दुबई येथे चायनीज सायबर गुन्हेगारासोबत मिळून सायबर गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरुद्ध हैदराबाद, तेलंगाना, काळेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सुमंत दसरे हा दुबई येथून सायबर गुन्ह्याचे रेकेट चालवत असल्याने प्रवीण स्वामी यांनी सुमंत दसरे याची माहिती काढून त्या आधारे पोलीस उपायुक्त यांनी एल ओ सी (look out circular notice) ओपन करण्यात आली. या एल ओ सी च्या आधारे इंटरपोलच्या मार्फतीने गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुमंत दसरे यास दुबई येथे ताब्यात घेवून त्याला दुबईहून दिपोर्ट केले. मुंबई विमानतळावर तो उतरल्यावर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी व त्यांच्या पथकाने ताब्यात घेवून पुण्यात आणून अटक केली.

त्याच्याकडे केलेल्या तपासात तो सुरुवातीला ६ हजार दिनार या पगारावर शेअर ट्रेडिंग व टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग, मेसेजींगचे काम करत होता. या कामामध्ये पितीतांकडून मिळालेल्या रक्कमेपैकी ४ टक्के रक्कम कमिशन मिळवत होता. त्यानंतर त्याने चायनीज आरोपीकडून वेगवेगळे कार्ड्स घेवून ते वेगवेगळ्या मॉल व इतर ठिकाणी स्वाईप करून महागड्या वस्तू खरेदी करत. या वस्तू चायनीज आरोपींना देवून त्यांच्याकडून कमिशन मिळवत असे. त्यादरम्यान त्यास सायबर गुन्ह्याची संपूर्ण माहिती समजली. त्याने चायनीज आरोपीबरोबर पार्टनरशिप मध्ये सायबर गुन्ह्याचे काम चालू केले. त्यामधून त्याला २० टक्के रक्कम मिळत असे. या कामासाठी तुषार व आदर्श यांनी १५० पेक्षा जास्त बँक खाती प्राप्त करून त्यावर सायबर फसवणुकीची रक्कम प्राप्त केले आहेत. त्यामधून त्याने आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त पैसे कमावले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या गुन्ह्यात तिघांना अटक केली आहे.

हि कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांची मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे,  दिगंबर गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलीस निरीक्षक रोहित डोळस, सागर पोमण, प्रकाश कातकडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार दीपक भोसले, नितेश बिचेवर, देवा वाघमारे, अतुल लोखंडे, स्वप्नील खणसे, श्रीकांत कबुले, माधव आरोटे, सोपान बोधवाड, दिपाली चव्हाण यांनी केली आहे.

You may have missed