Pune Crime News | पुण्यात खळबळ! दारुच्या नशेत पोलीस आयुक्ताच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांच्या अंगावर घातली कार, पोलीस अंमलदाराला अटक,  खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Pune Crime News | Panic in Pune! Attempt to break into the Police Commissioner's bungalow while drunk, car rammed into security guards, police officer arrested, case registered for attempted murder

पुणे : Pune Crime News |  दारुच्या नशेत भरधाव कार घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न एका पोलीस अंमलदाराने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने सुरक्षारक्षकांच्या अंगावर गाडी घालून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  ही घटना कोरेगाव पार्क परिसरातील पोलीस आयुक्तांच्या शासकीय बंगल्यामध्ये मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.

अमोल वसंतराव भिसे Amol Vasantrao Bhise (वय ४२) असे या पोलीस अंमलदाराचे नाव असून तो सध्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अमोल भिसे याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याची पोलीस मुख्यालयात सध्या नेमणूक आहे. दारुच्या नशेत तो कार घेऊन आला होता. त्याने कार मुख्य गेटला धडकवली. त्यात गेटचे नुकसान झाले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल भिसे याने ३ लग्ने केली आहेत. त्याच्या पत्नीने २०२५ मध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यात गुन्हा दाखल झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर २०२६ मध्ये त्याचे निलंबन रद्द करुन त्याला पुन्हा सेवेत घेऊन पोलीस मुख्यालयात नेमणूक दिली होती.

अमोल भिसे हा आपल्या नेमणूकीबाबत अस्वस्थ होता. त्याने काल सायंकाळी दारु पिली. त्यानंतर तो आपली कार घेऊन कोरेगाव पार्क येथील पोलीस आयुक्त यांच्या बंगल्याजवळ आला. बंगल्याच्या गेटवरील सुरक्षा रक्षक पोलिसांनी त्याला आत जाण्यास मनाई केली. तेव्हा तो कार घेऊन वेगाने आला. त्याने गेटवर कारने धडक दिली. कार वेगाने येत असल्याचे पाहून सुरक्षारक्षक बाजूला गेले. कारने धडक दिल्याने गेटचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अमोल भिसे याला ताब्यात घेतले. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून अमोल भिसे याला अटक केली आहे.

You may have missed