Pune Crime News | छत्रपती शिवाजी महाराज नगर न्यायालयासमोर हल्ला झालेला युवक हा कात्रज परिसरातील शुभम चव्हाण खुन प्रकरणातील आरोपी (Videos)

Pune Crime News | The youth attacked in front of the Chhatrapati Shivaji Maharaj Nagar Court is an accused in the murder case of Shubham Chavan from the Katraj area (Videos)

पुणे : Pune Crime News | छत्रपती शिवाजी महाराज नगर न्यायालयासमोर गोळीबार करुन कोयत्याने वार केलेल्याची ओळख पटली असून मंदार मारुती किवळे (वय ३६) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण़्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/DgKDicSJEFS

कात्रज परिसरात शुभम सुभाष चव्हाण (वय २८) याच्यावर २० एप्रिल २०२५ रोजी  जमिनीच्या वादातून खुन करण्यात आला होता. आंबेगाव  पोलिसांनी मंदार किवळे याच्यासह चौघांना सोलापूरमधून पकडले होते.

https://www.instagram.com/p/DgKIbnoJudA

त्यानंतर  काही दिवसापूर्वी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तो न्यायालयातील तारखेला हजर राहण्यासाठी आला असताना हा हल्ला झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन या सर्व प्रकरणाची माहिती घेतली.

https://www.instagram.com/p/DgKF2UKJ1yI

5 ते 6 आरोपी असून हल्लेखोरांची ओळख पटली आहे. त्यांना पकडण़्यासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना झाली असल्याचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DgKHFaxJsLm

You may have missed