Pune Crime News | शुभम चव्हाण याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नगर न्यायालयासमोर भरदुपारी आरोपीवर गोळीबार, कोयत्याने सपासप वार, सहा जण ताब्यात (Videos)

Pune Crime News | In broad daylight in front of Chhatrapati Shivaji Maharaj City Court, the accused was shot and repeatedly struck with a machete to avenge the murder of Shubham Chavan, six people taken into custody (Videos)

पुणे : कात्रज येथील संतोषनगरमधील २ गुंठे जागेवरुन शुभम चव्हाण याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यातील आरोपीवर छत्रपती शिवाजी महाराज नगर न्यायालयासमोर भरदुपारी दोन गोळ्या  झाडुन कोयत्याने सपासप वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी तातडीने हालचाल करुन त्यातील दोघांना दौंड परिसरात पकडले आहे. या कटाच्या सुत्रधाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/DgKpXntJAYL

मंदार किवळे याच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी आतापर्यंत ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघे दौंड परिसरात मिळाले असून तिसऱ्या कटाच्या सुत्रधाराला पकडले आहे. दरम्यान, आंबेगाव पठार आणि डेक्कन परिसरातून देखील आरोपीना ताब्यात घेतले आहे.  त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/DgKmwZDJqB1

सुरज मयेकर आणि प्रथमेश येनपुरे अशी दौंड येथून ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

https://www.instagram.com/p/DgKkQaTpJty

मंदार मारुती किवळे (वय ३६) हा गंभीर जखमी झाला असून ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्याची प्रकुती चिंताजनक आहे. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळया मंदार याच्या पाठीला चाटून गेली आहे. त्याच्या डोक्याच्या मागे फ्रॅक्चर झाले असून दोन्ही हातांवर अनेक ठिकाणी खोलवर जखमा झाल्याचे  ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DgKcP0-JkIO

शुभम चव्हाण याचा २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी कात्रज येथील साईछत्र अपार्टमेंटच्या पाठीमागील बोळात खुन करण्यात आला होता.  त्यात आंबेगाव पोलिसांनी अमर दिलीप साकोरे (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज), मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज), गिरीष सुभाष वावरे  (वय २६, रा. संतोषनगर,कात्रज) आणि योगेश बाबुराव डोरे (वय ३५, रा. खोपडेनगर, कात्रज) यांना अटक केली होती. शुभम चव्हाण याचे काका अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४६, रा. गणेश पार्क, संतोषनगर, कात्रज) यांनी  त्यांच्या घराजवळ २०२१ मध्ये २ गुंठे जागा विकत घेतली. त्या जागेचा ताबा घेण्यावरुन वाद होऊन त्यात शुभम चव्हाण याचा खुन करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात होते. मंदार किवळे याचा  जामीन होऊन तो १८ नोव्हेबर रोजी तुरुंगातून बाहेर आला होता.

https://www.instagram.com/p/DgKX9JWJ-Hz

मंदार याला जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यापासून शुभमच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी हल्लेखोर संधीची वाट पहात होते. न्यायालयातील तारखेला मंदार किवळे हा न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाल्याने हल्लेखोर त्याच्या मागावर होते. मंदार याच्यावर पाळत ठेवून ते न्यायालयाबाहेर थांबले होते.

https://www.instagram.com/p/DgKRlpKpAml

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मंदार न्यायालयातील गेट नंबर ४ मधून बाहेर आला आणि मेट्रो  स्टेशनच्या दिशेने जाऊ लागला. वाटेत हल्लेखोरांनी त्याला अडवले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. तेव्हा हल्लेखोरांपैकी दोघांनी पिस्तुल काढून त्याच्या दिशेने एका पाठोपाठ दोन गोळया झाडल्या. सुदैवाने दोन्ही गोळ्या  त्याला चाटून गेल्या. तेव्हा तो जीव वाचविण्यासाठी परत उलटा न्यायालयाच्या दिशेने पळू लागला. काही अंतर जाताच हल्लेखोरांनी त्याला फुटपाथजवळ गाठले. त्याच्यावर तिघांनी सपासप वार करण्यात सुरुवात केली. हे वार चुकविण्याच्या प्रयत्नात मंदार याने आपले दोन्ही हात आडवे केले. कोयत्याचे वार त्याच्या हातावर बसले. त्यात एक वार इतका जोरात होता की त्याचा डावा हात मनगटाजवळ तुटला. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात मंदार याचे दोन्ही हात, डोक्याच्या मागच्या बाजूला वार झाले. हल्लेखोर आम्ही कात्रजचे भाई आमच्या नादी लागायचे नाही, असा आरडाओरडा करत दोन दुचाकीवरुन ५ जण पळून गेले.

या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस सह आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, गौहर हसन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

भर गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकले. त्यातून पोलिसांना आरोपींची ओळख पटविणे सोपे झाले. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची १० पथके सर्वत्र रवाना करण्यात आली. त्यातून दौंड परिसरात दोघांना पकडण्यात आले आहे. शहराच्या डेक्कन आणि आंबेगाव पठार भागातून आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/DgKL5QaJlCr

You may have missed