Pune News Crime | नियमबाह्य कर्ज प्रकरणात जय भवानी सहकारी बँकेची 4 कोटी 46 लाखांची फसवणूक; बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune News Crime | नियमबाह्य कर्ज प्रकरणात जय भवानी सहकारी  बँकेची ४ कोटी ४६ लाख  ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक यांच्यासह २० जणांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक  राजेंद्र सीताराम कांबळे (वय ५६, रा. पाषाण-सूस रस्ता) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जय भवानी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय पडवळ Rajendra Dattatray Padwal (रा. नाना पेठ), उपाध्यक्ष रतन घनश्याम किराड Ratan Ghanshyam Kirad (रा. टिंबर मार्केट, भवानी पेठ), संजय सोपान गायकवाड Sanjay Sopan Gaikwad(रा. केशवनगर, मुंढवा), लक्ष्मण दगडोबा तरवडे  Lakshman Dagdoba Tarwade  (रा. कसबा पेठ), विलाससागर विक्रम श्रीपत Vilassagar Vikram Shripat  (रा. महात्मा फुले हौदाजवळ, गंज पेठ), संजय सूर्यकांत पवार Sanjay Suryakant Pawar (रा. भवानी पेठ), राजेंद्र सोपानराव गायकवाड  Rajendra Sopanrao Gaikwad (रा. मुंढवा), नंदकुमार बळवंत बहीरट  Nandkumar Balwant Bahirat  (रा. सिंहगड रोड), राजेंद्र यशवंत थोरात Rajendra Yashwant Thorat (रा. नाना पेठ), राम सोनबा कदम  Ram Sonba Kadam (रा. मार्कंट यार्ड), लक्ष्मण विश्वनाथ तुपे Lakshman Vishwanath Tupe (रा. साडेसतरा नळी, हडपसर), राजेश्री किशोर बाबर Rajeshri Kishor Babar (रा. सहकारनगर), मंदाकिनी शशीकांत यादव Mandakini Shashikant Yadav (रा. आनंदनगर, सिंहगड रोड), राजेंद्र दत्तात्रय ओरसे  Rajendra Dattatray Orse  (रा. गाडीतळ, हडपसर), काळुराम गुलाब फासगे Kaluram Gulab Fasge  (रा. रामटेकडी), लखमीचंद मेघराज गुलाबाणी Lakhmichand Meghraj Gulabani  , भाग्यश्री उदय शिंदे  Bhagyashree Uday Shinde, रविंद्र जनार्धन कोंडा Ravindra Janardhan Konda , रिक्षा एजंट विवेक अवधनारायण पांडे Vivek Avadhanarayana Pandey , कर्जदार नागनाथ श्रीधर ढेपे Nagnath Shridhar Dhepe , जय भोले चायनीज फास्ट फुडचे दत्तात्रय भागुजी हिंगणे Dattatray Bhaguji Hingne अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेत जय भवानी सहकारी बँकेची मुख्य शाखा आहे. या बँकेत २०२६ ते २०२८ या कालावधीत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळासह मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक, रिक्षा खरेदी करुन देणारे मध्यस्थ (एजंट), तसेच कर्जदारांनी संगनमत करुन बँकेत गैरव्यवहार केला. नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर करण्यात आली. बँकेतील रक्कमेचा अपहार केला, तसेच नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर करुन ४ कोटी ४६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. बँक आर्थिकदृष्ट्या  डबघाईला आल्यानंतर सहकार खात्याने विशेष लेखापरिक्षण केले होते. त्यात हा प्रकार समोर आला. त्यानंतर लेखापरिक्षक राजेंद्र कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बनकर तपास करत आहेत.

You may have missed