Shrinath Bhimale News | दुष्काळग्रस्तांसाठी श्रीनाथ भिमाले यांच्याकडून 25 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

Shrinath Bhimale News | Shrinath Bhimale provides 25 lakh aid for drought-affected people; responds to Chief Minister's appeal

पुणे : Shrinath Bhimale News |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपयांची मदत दिली.

मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन श्रीनाथ भिमाले आणि माजी नगरसेविका वंदना भिमाले यांनी या रकमेचा धनादेश सुपूर्द केला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत देण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भिमाले यांनी ही मदत दिली.

‘‘दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत दिली आहे,’’ असे भिमाले यांनी सांगितले.

You may have missed