Pune Crime News | सेल्स मॅनेजरनेच घातला गंडा ! बनावट पावत्या, आरटीओ पासिंग लेटर, इन्शुरन्स बनवुन 44 लाखांची फसवणुक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | तीन चाकी रिक्षाच्या शोरुममध्ये काम करणाऱ्या सेल्स मॅनेजरने बनावट पावत्या, आर टी ओ पासिंग लेटर व इन्शुरन्सची कागदपत्रे बनावट बनवुन ४४ लाख १३ हजार रुपयांची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पराग दिलीपराव पांडे (वय ४०, रा. पाषाण) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दीपक मोहन शिंगाडे (रा. लक्ष्मी लेक निवास, दत्तनगर, जांभुळवाडी, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौक येथील सुफलाम मोटार कंपनीत डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफलाम मोटार कंपनी यांच्याकडे पियाजिओ या तीन चाकी वाहनांची डिलरशीप आहे. त्यांच्या स्वारगेट येथील शोरुममध्ये दीपक शिंगाडे हे सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांनी फिर्यादींचा विश्वास संपादन करुन शोरुममध्ये येणाऱ्या  ग्राहकांना बनावट पावत्या, आर टी ओ पासिंग लेटर व इन्शुरन्सची बनावट कागदपत्रे बनवुन त्यांच्याकडून रोख रक्कम बँक खात्यावर घेतली. एकूण ५६ लाख ८८ हजार ७४० रुपयांची फसवणुक केली आहे.

कंपनीने केलेल्या लेखा परिक्षणात ही बाब समोर आली. त्यानंतर त्यांनी त्याची कबुली देऊन १२ लाख ७५ हजार रुपये कंपनीला परत केले. परंतु, उरलेले ४४ लाख १३ हजार ७४० रुपये कंपनीच्या खात्यावर न भरता शोरुममध्ये येणाऱ्या ग्राहकांची तसेच कंपनीची फसवणुक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र जगदाळे तपास करीत आहेत.

You may have missed