Pune Crime News | कर्ज घेतले असताना ते न फेडता परस्पर सदनिका, जमिनीची विक्री करुन दीड कोटींची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन पाच जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | मार्केटयार्ड येथील इमारत व रहाटवडे येथील जमीन तारण ठेवुन कर्ज घेतले असताना ते न फेडताना परस्पर फायनान्स कंपनीचा बोजा असताना त्या परस्पर विकून 1 कोटी 50 लाख 50 हजार रुपयांची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन हडपसर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महेबुब गफुर शेख (रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी महेंद्र ज्ञानोबा चोरघे Mahendra Gyanoba Choraghe (वय 50, रा. राजमुद्रा सोसायटी, धनकवडी), महेश बबन चोरघे Mahesh Baban Choraghe (वय 52, रा. बिबवेवाडी), श्रीकृष्ण आदिनाथ गोसावी Shrikrishna Adinath Gosavi (वय 43, रा. सिंहगड कॉलेज कॉम्पस, आंबेगाव), अनिल मधुकर बझरकर Anil Madhukar Bajrakar (वय 70, रा. कॅसलमिल कंपाउंड, ठाणे), अर्पणा सिद्धेश्वर बिराजदार Arpana Siddheshwar Birajdar (वय 50, रा. नेरुळ, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेबुब शेख यांची शामली इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स नावाची मनी लेंडर कंपनी आहे. त्यांच्या कंपनीकडून महेंद्र चोरघे यांना 70 लाख 50 हजार व महेश चोरघे यांना 80 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी 11 जानेवारी 2026 मध्ये मार्केटयार्ड येथील स्वप्नपुर्ती या इमारतीतील सदनिका आणि महेश चोरघे यांच्या मालकीचे रहाटवडे येथील 58 आर क्षेत्र गहाणखत म्हणून करुन दिले होते. त्यापैकी 12 लाख 50 हजार रुपये फिर्यादी यांना देऊन उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून रिलीज दस्त लिहुन घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांनी ऑनलाईन पाहिले असता महेश चोरघे व महेंद्र चोरघे यांनी त्यांचे पैसे न देता त्यांनी प्रॉपर्टी अर्जात नमुद केलेले अनिल मधुकर बझरकर, अर्पणा सिद्धेश्वर बिराजदार, श्रीकृष्ण अदिनाथ गोसावी यांना विकली व फायनान्स कंपनीचा बोजा असताना त्यांनी ती प्रॉपर्टी महाराष्टृ महामार्गाच्या अंतर्गत आलेली असून त्याचा मोबदला या तिघांनी एस डी ओ यांच्याशी हात मिळवुन करुन स्वीकारला आहे. फायनान्स कंपनीची कोणतीही एन ओ सी किंवा संमती न घेता परस्पर विक्री करुन दोघांनी 1 कोटी 50 लाख 50 हजारांची फसवणुक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
