Ashok Chavan | ‘मला संपवू नका, माझं म्हणणं मीच उद्या नाही राहिलो तर…’, अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नांदेड : Ashok Chavan | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अनेकदा त्यांच्या माध्यमांसमोरच्या प्रतिक्रिया उद्विग्न अशा प्रकारच्या समोर येत आहेत. आता त्यांचे एक भाषण चर्चेत आले आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/DAsTmNHir1c
अशोक चव्हाण म्हणाले, ” “विकासात्मक कामे करण्यासंदर्भात ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा करण्याकरिता अशोक चव्हाण सदैव तुमच्याबरोबर आहे, हे जाहीरपणे मी सांगतो. काही मतभेद नाहीत. पण माझ्या उणीवा लांबलचक यादी करून…. हे अशोक चव्हाण मुळे…. हे अशोक चव्हाणमुळे, माझे नाव घेतल्याशिवाय काही गमतच नाही.”
https://www.instagram.com/p/DAsVO-Kpdyd
ते पुढे म्हणाले, “माझं म्हणणं मीच उद्या नाही राहिलो, राजकीय क्षेत्रात कोणावर बोलणार तुम्ही? बोलणार कोणावर? माझं म्हणणं आहे की, मलाही जिवंत ठेवा. मी जिवंत राहिलो, तर तुम्ही पण जिवंत राहाल. मीच संपलो, तर तुम्ही कसे राहणार? तुम्हाला बोलायला काही राहणार नाही”
https://www.instagram.com/p/DAsM1hDpeUd
“मला संपवू नका. जी मंडळी टीका करतात, त्यांना म्हणतोय. २४ तास चालू असतात. एवढं तर वाईट केलं नाही ना कोणाचं? केलंय का? माझं म्हणणं एवढंच आहे की, इथंपर्यंत यायला ४० वर्षे गेली. शेलगावने मला साथ दिलेली आहे, मी नाकारणार नाही, विसरणार नाही”, असे अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे. त्यांचे हे वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (Ashok Chavan)
https://www.instagram.com/p/DAsF6pTCSum
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’