Chaitanya Maharaj Wadekar | प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या
पुणे: Chaitanya Maharaj Wadekar | समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेले कीर्तनकार चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज) यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) अटक केली आहे. चैतन्य महाराज यांनी त्यांच्या इतर दोन भावांसह आणि नातेवाईकांसह घराच्या जवळून जाणारा रस्ता पोकलेनने बेकायदेशीरपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
https://www.instagram.com/p/DApz4Y9Jhpe
याप्रकरणी चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज), अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.
https://www.instagram.com/p/DApyBl5pOiN
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळूंगे परिसरात चैतन्य महाराज राहतात. त्यांच्या घराच्या बाजूला एक कंपनी आहे. तेथून जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांचे वाद आहेत. बुधवारी (दि.२) रात्री कंपनीत जाणारा रस्ता बेकायदेशीरपणे खोदण्यात आल्याची तक्रार पोलिसांना मिळाली.
https://www.instagram.com/p/DApwR78iMX4
यामध्ये कंपनीच्या कंपाउंडचे पत्रे देखील काढले आहेत. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी महाळूंगे पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीत एका नातेवाईकासह दोन बंधुंची नावे आहेत. याप्रकरणी महाळूंगे पोलिसांनी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली आहे.
https://www.instagram.com/p/DApufhdiIIq
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’