Creative Foundation | क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे “कोथरूड नवरात्र महोत्सवात” रंगणार विविध सांस्कृतिक कार्यक्रम
प्रत्येक उत्सवाला लोकरंजना बरोबरच सामाजिक उपक्रमांची जोड – संदीप खर्डेकर
Creative Foundation | क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे “कोथरूड नवरात्र महोत्सवात” विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून कोथरूड डी पी रस्त्यावरील बधाई स्वीट चौक येथे हे कार्यक्रम रंगणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक विशाल भेलके, प्रतीक खर्डेकर व उमेश भेलके यांनी सांगितले.घटस्थापने नंतर एकदंत वाद्य पथकाच्या उत्तम ढोल वादनाने महोत्सवाची सुरुवात झाली असून आमच्या क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या तत्वानुसार आम्ही सर्व उत्सवांना सामाजिक कार्याची व लोकोपयोगी साहित्य वाटपाची जोड देतो त्यानुसार याही वर्षी दिव्यांगांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटनांना मदत केली जाणार असल्याचे कोथरूड नवरात्र उत्सवाचे मार्गदर्शक संदीप खर्डेकर व क्रिएटीव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.
येथील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सौ. श्वेताली भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर व सौ. अक्षदा भेलके यांनी केले असून यात गुरुवार 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत बालजत्रा आयोजित केली असून तेथे मुलांना विविध खेळांचा आनंद लुटता येणार आहे.17 व 18 ऑक्टोबर रोजी लहान मुलांच्या स्पर्धा तसेच महिलांची महा आरती व भोंडला आयोजित करण्यात आला आहे.
दि.19 व 20 ऑक्टोबर रोजी सायं 7 ते रात्रौ 12 वाजेपर्यंत रास दांडिया रंगणार असून बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सायं 7 ते 10 ” दिलबरा तुमच्यासाठी ” हा लावणी चा कार्यक्रम होणार असून गुरुवार दि.22 ऑक्टोबर सायं 7 ते 10 ” मायबोली महाराष्ट्राची ” हा महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 ते 10 यावेळेत ” ऑर्केस्ट्रा अलबेला ” हा जुनी हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे श्वेताली भेलके, कल्याणी खर्डेकर व अक्षदा भेलके यांनी सांगितले.
शनिवार दि. 24 ऑक्टोबर रोजी खास महिला वर्गासाठी बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत ” होम मिनिस्टर ” खेळ रंगला वहिनींचा हा कार्यक्रम सादर केला जाणार असून यासाठी विविध बक्षीसे देण्यात येणार आहेत असे नवरात्र उत्सवाच्या मार्गदर्शक सौ. मंजुश्री खर्डेकर व उत्सव प्रमुख सौ.कल्याणी खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके व सौ. अक्षदा भेलके यांनी जाहीर केले.
सर्व कार्यक्रम मोफत असून नागरिकांनी ह्या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन विशाल भेलके, उमेश भेलके व प्रतीक खर्डेकर यांनी केले आहे.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व दांडिया च्या आयोजनाने या महोत्सवाचा समारोप होईल.
