Hadapsar Pune Crime News | जामीन मिळाल्याने सराईत गुन्हेगाराने मिरवणुक काढत पसरविली दहशत; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पुणे : Hadapsar Pune Crime News | खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) याने तळोजा तुरुंगापासून (Taloja Jail) पुण्यापर्यंत भव्य मिरवणुक काढली होती. ही मिरवणुक राज्यभर गाजली. त्यामुळे आता छोटे मोठे गुंडही जामीन मिळाल्यानंतर मिरवणुका काढून जल्लोष करु लागले आहेत. मांजरी येथील एका गुंडाने मिरवणुक काढून जल्लोष केला. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) त्याच्याबरोबरच त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAsF6pTCSum

याबाबत पोलीस अंमलदार उमेश मच्छिंद्र शेलार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋषिकेश कामठे Rishikesh Kamthe (रा. महादेवनगर, मांजरी), त्याचे साथीदार गणेश शिंदे, रोहन शिंदे, अक्षय कांचन, प्रतिक कांचन, प्रकाश होले व इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मांजरीतील महादेवनगर (Mahadev Nagar Manjari) येथे १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात ते पावणे आठ दरम्यान घडला.

https://www.instagram.com/p/DAsM1hDpeUd

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश कामठे हा सराईत गुन्हेगार (Criminal On Police Record) असून त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर (Loni Kalbhor Police), हडपसर पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी, दरोडा व लुटमार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

https://www.instagram.com/p/DAsKJoRpeVn

हॉटेल व्यावसायिकाला धमकावून लुबाडल्याप्रकरणी ऋषिकेश कामठे व त्याच्या साथीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात त्याला २७ जुलै २०२४ रोजी अटक केली होती. या गुन्ह्यात नुकताच त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी मांजरीतील महादेवनगर परिसरात त्याची मिरवणूक काढून जल्लोष करीत लोकांमध्ये दहशत पसरविली. पोलीस उपायुक्त श्रीधर यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याने कामठे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Hadapsar Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAsIFbJJplU

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed