Harshvardhan Patil | ठरलं! हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेण्याचं केलं निश्चित; देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ झाल्याची माहिती समोर

Harshvardhan Patil

इंदापूर : Harshvardhan Patil | मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी (Tutari) हाती घेणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीत (Mahayuti) प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे पाहायला मिळाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ साली काँग्रेसला (Congress) रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुढे राष्ट्रवादी फुटून अजित पवार गटाने महायुतीला साथ दिली. त्यानंतर इंदापूर मतदारसंघातील (Indapur Assembly Constituency) राजकीय समीकरण बदललं. (Harshvardhan Patil Will Join Sharad Pawar NCP)

https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3

पक्षात बंड झाल्यानंतर इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी देखील अजित पवारांना साथ दिली. त्यामुळे आता इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचा विद्यमान आमदार असल्याने ही जागा महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार (Mahayuti Seat Sharing Formula) राष्ट्रवादीकडे गेल्याचे बोलले जातेय. महायुतीतून भरणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्व घडामोडीमुळे इंदापूरमधील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/DApnifUJzzl

दरम्यान आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचे निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची हर्षवर्धन पाटलांची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा पक्षप्रवेश पुण्यात पार पडणार असण्याची दाट शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/DAps04UJ8or

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’