Harshvardhan Patil Join Sharad Pawar NCP | हर्षवर्धन पाटलांनी केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा; राष्ट्र्वादीतल्याच पदाधिकाऱ्यांच्या विरोधाच्या भूमिकेवर म्हणाले..

इंदापूर : Harshvardhan Patil Join Sharad Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओक या निवास्थानी शरद पवार यांची भेट काल भेट घेतल्यानंतर आज कार्यकर्ता मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आणि सूचनेनुसार आपण राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. (Indapur Assembly Constituency)
https://www.instagram.com/p/DAsTmNHir1c
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, मागील दीड महिनापासून सूत्रांच्या माहितीनुसार म्हणून माध्यमे माझा पक्षप्रवेश होणार म्हणून बातम्या देत होते. मात्र आता तुमचा सूत्रधार मीच सांगतोय म्हणून बातम्या करा, असे मिश्किल विधान करत त्यांनी तुतारी हातात घेणार असल्याची घोषणा केली आहे. आपण भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/DAsQ72uiLjP
आजपर्यंत पवार घराण्याशी आपला राजकीय संघर्ष राहिला आहे मग त्याच पक्षात प्रवेश आपण करताय, या माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना पाटील म्हणाले, राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो. पवार साहेबांचे आणि आमचे राजकारणापलीकडे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे या गोष्टींना जास्त अर्थ उरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
https://www.instagram.com/p/DAsKJoRpeVn
आपल्या पक्ष प्रवेशाला इंदापूरमधील शरद पवार गटातीलच काही पदाधिकारी विरोध करत आहेत त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील असे म्हणत त्यांनी याबाबत जास्त बोलणे टाळले.
https://www.instagram.com/p/DAsO_Nxp1bN
दरम्यान आता इंदापूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. (Harshvardhan Patil Join Sharad Pawar NCP)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’