Haryana Assembly Election 2024 | विनेश फोगाटने एका झटक्यात राजकीय मैदान मारले ! भाजपच्या योगेश कुमारचा केला पराभव

Vinesh Phogat

काँग्रेसला 25 वर्षांनंतर मिळाला जुलाना मतदार संघ

पुणेरी आवाज – Haryana Assembly Election 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकीत ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवली होती ज्यात तिने बाजी मारत भाजपच्या (BJP) योगेश कुमारचा (Yogesh Kumar BJP) पराभव केला. तिच्या विजयामुळे गेली पंचवीस वर्ष काँग्रसला हुलकावणी देणारा हा मतदारसंघ अखेर त्यांच्या ताब्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr

या निवडणुकीत विनेश फोगाटच्या विरोधात भाजपच्या योगेश कुमार यांच्यासह 13 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये विनेशने पाच हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. जुलाना येथे 1. 87 लाख मतदार असून त्यापैकी 70 टक्के मते जाट समाजाची आहेत. यावेळी 5 पैकी 4 प्रमुख पक्षांनी जाट उमेदवारांना तिकीट दिले होते. या जागेवरून दोन महिला कुस्तीपटूंमध्येही लढत झाली. आम आदमी पार्टीने WWWE महिला कुस्तीपठू कविता दलालवर यांना उमेदवारी दिली होती. परंतू विनेश आणि भाजपचे योगेश यांच्यात थेट लढत झाली.

https://www.instagram.com/p/DA2ivy9ItUq

संघर्षाचा विजय

निवडणुकीत विनेशला 65080 मतं मिळाली. विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. विनेश यांनी म्हटले की, संघर्षाचा मार्ग निवडलेल्या प्रत्येक मुलीचा आणि महिलेचा हा लढा आहे. हा संघर्षाचा आणि सत्याचा विजय असून देशाने देलेले प्रेम आणि विश्वास कायम जपेन.

https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3

बलाढ्य जुलमी शक्तींविरूध्द विजय

दरम्यान विनेशने मिळवलेल्या या विजयानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने विनेशला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्य एक्स पोस्टमध्ये बजरंगने विनेशला शुभेच्छा देताना देश की बेटी म्हटले आहे. तसेच हा लढा केवळ जुलाना मतदार संघासाठीचा नव्हता, तर देशातील सर्वात शक्तीशाली आणि दमन करणार्या शक्तींच्या विरोधात होता आणि विनेश यात जिंकली. असे ही बजरंग याने म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/DA2uCK0ijzv

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed