Hemant Aba Bagul | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तासन्तास चर्चा करण्यापेक्षा तातडीने मदत करणे महत्त्वाचे! – हेमंत बागुल

Hemant Aba Bagul | It's more important to provide immediate help rather than discuss farmers' issues for hours! - Hemant Bagul

पुणे : Hemant Aba Bagul |  आज पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेली चर्चा ही शेतकरी संकटात असताना केवळ भाषणबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकलेली दिसून आली. एकीकडे शेतकरी संकटाचा सामना करत असताना, त्यांच्या मदतीसाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याऐवजी तासन्तास चर्चा करण्यात कितपत औचित्य आहे, असा सवाल शिवसेनेच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करण्याची इच्छा असेल, तर केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता महापौरांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेऊन मदतीबाबत ठोस निर्णय करता आला असता. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आज आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची अधिक गरज आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

शिवसेना पक्ष केवळ चर्चा करत नाही, तर प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेत आहे. राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून हेमंत बागुल यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती मा. नीलमताई गोऱ्हे यांनी १.५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही मिळून आणखी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना आधार देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कृती करणे, हीच खरी सामाजिक आणि राजकीय बांधिलकी आहे.

शेतकऱ्यांच्या दुःखावर राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या अश्रूंना आधार देणे महत्त्वाचे आहे. चर्चा जरूर व्हावी; मात्र त्या चर्चेतून तातडीने निर्णय आणि प्रत्यक्ष मदतही मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, हीच आमची ठाम भूमिका आहे.

You may have missed