Kalicharan Maharaj In Pune | समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा – कालीपुत्र श्री कालीचरण महाराज
श्री सच्चियाय माता मंदिर येथे महाआरती संपन्न
पुणे : Kalicharan Maharaj In Pune | समस्त हिंदू समाजातील रुजलेला जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद दूर व्हावा. तसेच भारत पुन्हा एकदा चक्रवादी सम्राट आणि ‘सोने की चिडिया” व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी, अशी मनोकामना कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांनी श्री सच्चियाय माता देवी चरणी व्यक्त केली. (Sachiya Mata Temple Pune)
https://www.instagram.com/p/DA3VDZZJdqF
श्री शारदीय नवरात्री निमित्त श्री सच्चियाय माता चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने श्री सच्चियाय माता मंदिर, कात्रज येथे कालीपुत्र श्री कालीचरणजी महाराज यांच्या हस्ते भव्य महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री सच्चियाय माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोदशेठ दुगड़, गौरवशेठ दुगड,मोनल गौरवशेठ दुगड आणि सर्व दुगड परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/DA3M-sLJK_7
कालीपुत्र श्री कालीचरणजी महाराज म्हणाले, शारदीय नवरात्री महोत्सवात समस्त भारतातील हिंदू जगदंबेच्या आराधनेत लीन आहेत. श्री सच्चियाय माता मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी मी समस्त हिंदू समाजासाठी देवीकडे प्रार्थना केली आहे. दुगड परिवाराच्या वतीने येथे खूप व्यवस्था करण्यात आली असून त्यांचा भक्तिभाव अपूर्व आहे.
https://www.instagram.com/p/DA3J_G3plE0
श्री सच्चियाय माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोदशेठ दुगड़ यांनी देवस्थानाची माहिती दिली. ते म्हणाले, मागील 30 वर्षांपासून आम्ही येथे नवरात्र उत्सव साजरा करत आहोत. माझे वडील माणिकचंदजी (भाऊसा) दुगड आणि आई पुष्पादेवीजी दुगड यांनी या देवीची येथे प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यांचा वारसा पुढे चालवत आहोत,आज कालीचरण महाराजांचा आशीर्वाद आम्हाला आणि भक्तांना लाभला याचा आनंद होतो आहे.
https://www.instagram.com/p/DA20O3LpWwm
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’