Karve Nagar Pune Crime News | आईशी फोनवर बोलत असतानाच त्याने गळ्यावर वार करुन केली आत्महत्या; कर्वेनगरमधील घटनेत ठेकेदाराला अटक

Suicide

पुणे : Karve Nagar Pune Crime News | बरोबर राहणारा मित्र २५ हजार रुपये घेऊन पळून गेला. ते पैसे आता तुच दे असे म्हणून ठेकेदाराने पैसे परत करण्याचा लकडा लावला. हाताने मारहाण करुन रुममध्ये कोंडून ठेवले. त्यामुळे हे पैसे देण्यासाठी त्याने गावाकडे घरी फोन लावला. आईशी बोलत असतानाच त्याने स्वत:च्या गळ्यावर आणि पोटात चाकू खुपसुन आत्महत्या केली. ही घटना कर्वेनगरमधील भोलकरवस्ती येथे ३० सप्टेबर रोजी दुपारी २ वाजता घडली. (Suicide Case)

https://www.instagram.com/p/DAsM1hDpeUd

रामविकास जयसिंग चौहान (वय २६, रा. राधिया, देवरिया, ता. हाटा, कुशीनगर, उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत अर्णव जवाहिर चौहान (वय २२, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सत्येंद्र राजपती चौहान (वय ३६, रा. देशमुखवाडी, शिवणे) याला अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DAsKJoRpeVn

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सर्वजण हे मुळचे उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. ते पेटिंगची कामे करतात. सत्येंद्र चौहान हा काही वर्षापूर्वी पुण्यात येऊन पेटिंगची कामे करु लागला. त्यानंतर काही तरुणांना तो गावाकडून घेऊन आला. ते त्याच्या हाताखाली काम करतात. रामविकास चौहान हाही त्याच्याकडे पेटिंगचे काम करत होता. त्याबरोबर रामविकास याचा गावाकडून आलेला मित्रही त्यांच्याबरोबर राहून पेटिंगचे काम करत होता. रामविकासचा मित्र सत्येंद्र याच्याकडून २५ हजार रुपये घेऊन पळून गेला. त्याला तुम्हीच पळवून लावले, आता ते २५ हजार रुपये तू दे, अशी मागणी सत्येंद्र चौहान रामविकासकडे करत होता. पैसे न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी देऊन त्याला मारहाण केली. तसेच रुमच्या दरवाजास बाहेरुन कुलूप लावून कोंडले होते. वेळोवेळी शारीरीक व मानसिक त्रास देऊन भिती घातली होती.

https://www.instagram.com/p/DAsO_Nxp1bN

रामविकास याने ३० सप्टेबर रोजी दुपारी गावाकडे आपल्या आईला फोन लावला होता. तो आईकडे पैशांची मागणी करीत होता. परंतु, आईनेही इतके पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे निराश झालेल्या रामविकास याने घरातील भाजी कापण्याचा चाकूने गळ्यावर वार केला. तसेच तोच चाकू पोटात खुपसुन घेतला. गंभीर जखमी झालेल्या रामविकास याच्यावर उपचार करण्यात येत होते. उपचार सुरु असतानाच गुरुवारी त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन सत्येंद्र चौहान याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तरडे तपास करीत आहेत. (Karve Nagar Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAsVO-Kpdyd

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed