Khadakwasla Assembly Constituency | विधानसभेच्या उमेदवारीवरून पुण्यात भाजपाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी; इच्छुकांचे दोन गट आमने-सामने
पुणे: Khadakwasla Assembly Constituency | विधानसभेच्या तिकिटावरून (Maharashtra Assembly Election 2024) पुण्यात भाजपचे नेते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळत आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्यासोबतच माजी नगरसेवक प्रसन्न जगताप (Prasanna Jagtap), दिलीप वेडे पाटील (Dilip Vede Patil) आणि दीपक नागपुरे (Deepak Nagpure) यांचे नाव चर्चेत आहे. यापैकी एक नाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी निश्चित होऊ शकते.
https://www.instagram.com/p/DAnu3UZCvlv
मात्र तत्पूर्वी (दि.१) झालेल्या भाजपच्या बैठकीत आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी आल्याची माहिती समोर आली आहे. भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारांच्या बाचाबाची झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/DAnp-EwCbQ1
आमदार भीमराव तापकीर यांनी कोणालाच न बोलून देण्याचा आरोप भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी केला आहे. हा सर्व प्रकार भाजपचे केंद्रातून आलेले निरीक्षक धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यासमोर आला असून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दोन इच्छुकांचे गट आमने-सामने ठाकल्याचे पाहायला मिळाले.
https://www.instagram.com/p/DAniUBVCJy8
खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे तीनदा आमदार झाले आहेत. आता चौथ्यांदा देखील ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता. यामुळे यंदा त्यांच्याबाबत मतदारसंघांमध्ये अँटी इन्कम्बन्सीच असल्याचे इतर इच्छुक सांगत आहेत.
https://www.instagram.com/p/DAnQ2LKJ3IC
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत आणि हाच वादाचा मुद्दा ठरला आहे. आम्ही इच्छुक असून आम्हाला बोलू का दिले नाही यासंदर्भात आम्ही वरिष्ठांशी तक्रारी केल्या आहेत.’ अशी माहिती प्रसन्न जगताप यांनी दिली आहे.
https://www.instagram.com/p/DAldwGhpRx7
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’