Khadki Pune Crime News | महिला शिक्षकाच्या घरात शिरुन सामानाचे केली नासधुस ! भाई म्हणविणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल

Khadki Police Station

पुणे : Khadki Pune Crime News | स्वत: ला भाई म्हणविणार्‍या टोळक्याने एका महिला शिक्षकीच्या घरात शिरुन सर्व सामानाची नासधुस करुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DA5Fq_eCh-Q

याप्रकरणी खडकीतील गोपी चाळ येथे राहणार्‍या एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आशिष कांगणे (वय १८, रा. खडकी), गौरव कांगणे (वय १९), छोटा लोहार (वय २०), अलोक रोकडे ऊर्फ सोनु (वय १९), मॅड्या ऊर्फ यश साळवे (वय २०, रा. खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी सोमवारी दुपारी चार वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DA480yAppjM

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात काही वाद झाले होते. फिर्यादी या घरात ट्युशन घेत होत्या. त्यावेळी आरोपी घरात शिरले. त्यांनी घरात येऊन मुलगा कोठे आहे, असा जाब विचारला. आशीष कांगणे याने हातातील रॉडने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करुन त्याची तोडफोड करुन नुकसान केले. अश्लिल शिवीगाळ करुन दमदाटी केली. आम्ही इथले भाई आहे, असे म्हणत दहशत निर्माण केली आहे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करीत आहेत. (Khadki Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA5JlDdJdG1

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’