Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)
पुणे : Kothrud Pune Accident News | थोडेसे लांब पडत असल्याने अनेक जण मोठ मोठ्या दुभाजकांवर चढून रस्ता ओलांडत असतात. मोठ्या दुभाजकावरुन रस्ता ओलांडणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. उंच असलेल्या दुभाजकावरुन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणार्या या तरुणीला वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरची धडक बसल्याने त्यात तिचा मृत्यु झाला. कोथरुड बसस्टँडसमोर आज सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.
आरती सुरेश मनवाने (वय २३, रा. एरंडे होस्टेल, भेलके नगर, कोथरुड) असे या तरुणीचे नाव आहे.
https://www.instagram.com/p/DA5XTqzJM5G
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरती मनवाने ही मुळची अमरावतीची राहणारी आहे. कर्वे पुतळा पासून पुढे डहाणूकर कॉलनीपर्यंत कर्वे रोडवर मोठा उंच दुभाजक आहे. सुतार बसस्टँँड समोरुन या उंच दुभाजकावरुन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न आरती ही करत होती.
https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF
त्याचवेळी डहाणुकर कॉलनीकडून (Dahanukar Colony Pune) कर्वे पुतळ्याच्या दिशेने एक सिमेंट मिक्सर वेगाने येत होता. त्याची धडक आरतीला बसली. त्यामुळे ती खाली पडून मिक्सरचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यु झाला. मिक्सर चालकाने काही अंतरावर मिक्सर थांबून तेथून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. अलंकार पोलीस (Alankar Police) अधिक तपास करीत आहेत. (Kothrud Pune Accident News)
https://www.instagram.com/p/DA5JlDdJdG1
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’