Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसच्या आशा-आकांक्षांना तडा गेला आहे. हरियाणामध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक साजरी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणाच्या निकाल काँग्रेसच्या बाजूने लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपने बहुमताचा आकडा गाठत दणदणीत विजय मिळवला. हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपने आपली रणनीती बदलल्याचे दिसून येत आहे. (Mahayuti News)

https://www.instagram.com/p/DA5NGFMpQRd

राज्यात शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सहानुभूतीची लाट कायम आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण (Badlapur Sexual Assault Case) आणि शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या (Malvan Shivaji Maharaj Statue) घटनेनंतर महायुती काही प्रमाणात बॅकफूटवर गेली होती. पण हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुती सरकारने (Mahayuti Govt) लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर केली. पण त्यानंतरही महायुतीलला अपेक्षित असा परिणाम दिसत नव्हता. मात्र कालच्या हरियाणा निकालाने महाराष्ट्रात भाजपला नवीन ऊर्जा दिली आहे. भाजपसाठी हा बूस्टर डोस मानला जातोय.

https://www.instagram.com/p/DA5Fq_eCh-Q

दरम्यान येत्या आठवड्यात भाजपकडून उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली आहे. विद्यमान आमदारांच्या जागा वगळता इतर कोणतीही जागा हवी असेल तर, जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार दाखवा आणि मगच मतदारसंघ घ्या, अशी भाजपची स्ट्रॅटेजी असणार आहे.

https://www.instagram.com/p/DA480yAppjM

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. हरियाणामध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यामुळे काँग्रेसची कामगिरी मित्रपक्षांवर बऱ्यापैकी अवलंबून आहे, असं दिसून आलं आहे. हीच बाब शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) बोलून दाखवली.

https://www.instagram.com/p/DA3no9Pi7T8

महाराष्ट्रात देखील काँग्रेसची कामगिरी मित्रपक्षांवर जास्त अवलंबून असेल, असं या हरियाणाच्या निकालातून स्पष्ट होतंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि शिवसेना ठाकरे गट सध्या फ्रंटफूटवर आल्याचं दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DA3VDZZJdqF

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed